Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये रोटरी क्लबच्या ‘आनंदी रस्ते’ उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद
सामाजिक

संगमनेरमध्ये रोटरी क्लबच्या ‘आनंदी रस्ते’ उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

‘आनंदी रस्ते’ उपक्रमामुळे संगमनेर शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, हा उपक्रम पुढील वर्षी अधिक उत्साहात साजरा केला जाईल, असे आयोजकांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –
रोटरी क्लब ऑफ संगमनेर तर्फे आयोजित करण्यात आलेला ‘आनंदी रस्ते’ हा अनोखा उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला. शहरातील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला प्रतिसाद दिला.
रोटरी क्लबच्या आनंदी रस्ते या उपक्रमात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात तसेच संगमनेर शहरातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
यंदा या उपक्रमाचे नववे वर्ष होते आणि यामध्ये विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलने गायन, पथनाट्य, मल्लखांब तसेच वादनाचे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण प्रयागराज कुंभमेळ्याच्या थीमवर आधारित आयोजन होते, ज्यामध्ये अघोरी साधू म्हणून उद्योजक प्रकाश कलंत्री, आनंद मणियार व ऋग्वेद वाकचौरे हे प्रमुख आकर्षण ठरले.
तसेच झुंबा डान्स, मल्लखांब, जादूचे प्रयोग, अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्र सादरीकरण आदींच्या माध्यमातून कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अडीच हजार चौरस फूट लांबीचा तिरंगा नागरिकांनी फडकविला. वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारून गेले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष साईनाथ साबळे, सेक्रेटरी विश्वनाथ मालाणी, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, खजिनदार विकास लावरे तसेच सर्व प्रकल्प प्रमुख, प्रकल्प समन्वयक आणि रोटरी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमासाठी मे. पोपट भगीरथ महाले ज्वेलर्स, बंसल क्लासेस, मायक्रोन एरोसोल, राजपाल क्लॉथ, रॉयल इव्हेंट्स, सप्तरंग पेंट्स, गॅझेट हब, राजेंद्र होंडा, प्राईम इंटरप्रायजेस, डॉ. सचदेव सोनोग्राफी सेंटर, संत गुलाबबाबा रंग भंडार आणि साईनाथ साबळे अँड कंपनी यांनी आर्थिक मदत करत मोलाचे योगदान दिले.
‘आनंदी रस्ते’ उपक्रमामुळे संगमनेर शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, हा उपक्रम पुढील वर्षी अधिक उत्साहात साजरा केला जाईल, असे आयोजकांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 762
आनंदी रस्ते रोटरी क्लब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

By Annant Ppangarkar16/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. दिवसभरात एखादी गोड…

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.