Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुलाकडील जमीन एका दिवसात वडिलांच्या नावे; जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केलेल्या ज्येष्ठ नागरिकाला प्रांताधिकारी पांगारकर यांनी दिला न्याय
प्रशासन

मुलाकडील जमीन एका दिवसात वडिलांच्या नावे; जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केलेल्या ज्येष्ठ नागरिकाला प्रांताधिकारी पांगारकर यांनी दिला न्याय

प्रांताधिकाऱ्यांनी त्या मुलाला तीनवेळा वॉरंट काढून पोलिसांमार्फत बजावणीचे आदेश दिले होते. मात्र, त्याची बजावणी झाल्याची नोंद पोलिसांत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोलापूर, दि. २७ मार्च – 

प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही वडिलांना दरमहा १० हजार रुपयांची पोटगी न देणाऱ्या मुलाच्या नावावरील २२ गुंठे जमीन पुन्हा वडिलांच्या नावे करण्यात आली आहे. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायद्यातील विशेषाधिकाराचा वापर करून ही कारवाई केली आहे.

अरण (ता. माढा) येथील २२ गुंठे जमीन मुलाच्या नावे करूनही तो आई-वडिलांना सांभाळत नव्हता. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी अरण येथील सोपान वासुदेव राऊत (वय ७०) यांना दरमहा १० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले. पण, त्यावेळी देखील तो सुनावणीला हजर राहत नव्हता. निकालानंतर मुलाने सहा महिन्यात कधीही पोटगीची रक्कम न दिल्याने सोपान राऊत यांनी तत्कालीन प्रांताधिकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे घातले.

तरी, काहीच कार्यवाही होत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विष प्राशन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला त्यांचे दुःख समजले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सध्याच्या प्रभारी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना त्यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले होते.

त्यानुसार प्रांताधिकारी पांगारकर यांनी पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायद्यातील कलम २३ नुसार त्यांनी मुलाला बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीचा सातबारा उतारा रद्द करून ती जमीन पुन्हा सोपान राऊत यांच्या नावे केली. आता बदलेला सातबारा व फेरफार संबंधित तलाठ्यांच्या हस्ते सोपान राऊत यांना सन्मानाने दिला जाणार आहे.

माढ्याच्या तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी सुनावणीअंती सोपान राऊत यांच्या मुलाने दरमहा १० हजार रुपयांची पोटगी द्यावी, असा निकाल दिला होता. त्याअनुषंगाने पोटगी देणे अपेक्षित असताना देखील तो आदेश पाळत नव्हता. म्हणून सोपान राऊत यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी त्या मुलाला तीनवेळा वॉरंट काढून पोलिसांमार्फत बजावणीचे आदेश दिले होते. मात्र, त्याची बजावणी झाल्याची नोंद पोलिसांत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्या मुलाला वॉरंट काढण्यात आले आहे.

आठवडाभरात पोटगीचा विषयी मार्गी लागेल… “अरण येथील सोपान वासुदेव राऊत यांच्या मुलाला दिलेली २२ गुंठे जमीन, पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायद्यातील तरतुदीनुसार, त्यांच्या नावे परत करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या पोटगीचा विषयही आठवड्याभरात मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.” – विजया पांगारकर, प्रांताधिकारी, माढा.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,343
पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा प्रांताधिकारी माढा विजया पांगारकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.