Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन

22/10/2026

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्याच्या आर्थिक डळमळीत स्थितीवर कठोर पाऊल: फुकट योजनांना कात्री, ‘लाडकी बहीण’ला ब्रेक!
प्रशासन

राज्याच्या आर्थिक डळमळीत स्थितीवर कठोर पाऊल: फुकट योजनांना कात्री, ‘लाडकी बहीण’ला ब्रेक!

या कठोर पावलांमुळे राज्याच्या आर्थिक संकटावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असला, तरी लोकप्रिय योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. १ एप्रिल – 

राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक संकटाचे भयावह चित्र समोर आले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे अशक्य होत असताना, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कठोर परिपत्रक जारी करून खर्चावर नियंत्रणाचे आदेश दिले आहेत. फुकट अनुदान योजनांना पूर्णपणे आळा घालण्याच्या सूचना दिल्याने, ‘लाडकी बहीण’ योजनेतील वाढीव २१०० रुपये मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना मर्यादित निधीचा सुयोग्य वापर करून अनुत्पादक अनुदान योजना बंद करण्याचे आणि उत्पादक भांडवली खर्च वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला आणि आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोसळली.

आता २०२५-२६ साठी सादर झालेल्या ४५ हजार कोटींच्या तुटीच्या अर्थसंकल्पाने आणि १ लाख ३६ हजार कोटींच्या राजकोषीय तुटीने संकटाची तीव्रता अधोरेखित केली आहे. एकूण महसुली जमेपैकी ५७ टक्के रक्कम अनिवार्य खर्चासाठीच खर्ची पडत असल्याने, मुख्य सचिवांनी पंतप्रधानांच्या सूचनांचे पालन करत आर्थिक शिस्तीसाठी कठोर पावले उचलली आहेत.

योजनांवर कठोर निर्बंध… मंत्रिमंडळाच्या निर्णयांमध्ये आर्थिक भार किंवा निकष बदलण्याचा प्रस्ताव असल्यास, वित्त व नियोजन विभागाची पूर्वसहमती अनिवार्य करण्यात आली आहे. परिणामी, ‘लाडकी बहीण’ योजनेतील २१०० रुपयांची घोषणा प्रत्यक्षात येण्यापूर्वी वित्त विभागाच्या मंजुरीची अट लागू झाली आहे. सध्याच्या आर्थिक अडचणीत वित्त विभाग वाढीव रकमेला मान्यता देण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे महायुतीच्या लोकप्रिय योजनांना मोठा चाप बसणार हे निश्चित झाले आहे.

परिपत्रकातील कडक सूचना… मुख्य सचिवांनी जारी केलेल्या परिपत्रकात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून अनिवार्य खर्च मर्यादित ठेवण्याचे आणि जाणीवपूर्वक निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी विद्यमान योजना बंद करणे किंवा एकत्रीकरण करणे आवश्यक असून, त्याची माहिती मंत्रिमंडळ प्रस्तावात नमूद करावी, असे स्पष्ट केले आहे. अनिवार्य खर्चासाठी वित्त विभागाचा आणि कार्यक्रम खर्चासाठी नियोजन व वित्त विभागाचा अभिप्राय मंत्रिमंडळ टिप्पणीत समाविष्ट नसल्यास प्रस्ताव सादर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

या कठोर पावलांमुळे राज्याच्या आर्थिक संकटावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असला, तरी लोकप्रिय योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,290
फुकट योजनांना कात्री लाडकी बहीण योजना सुजाता सौनिक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन

By Annant Ppangarkar22/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील वस्तीजवळ सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे पसरणाऱ्या…

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.