Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘श्रमप्रतिष्ठा सन्मान सोहळा’: कष्टकरी पालकांना रोटरी क्लबचा मानाचा मुजरा
सामाजिक

‘श्रमप्रतिष्ठा सन्मान सोहळा’: कष्टकरी पालकांना रोटरी क्लबचा मानाचा मुजरा

या कार्यक्रमात पाच कुटुंबांचा सन्मान करण्यात आला, ज्यांनी अनेक अडचणींवर मात करत आपल्या मुलांना विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी बनवले. या मुलांनी प्रशासन, महसूल, पोलीस, वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/05/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

रोटरी क्लब ऑफ संगमनेरने नुकताच ‘श्रमप्रतिष्ठा सन्मान सोहळा’ आयोजित करून समाजातील कष्टकरी परंतु आपल्या मुलांना यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या पालकांना आदराने गौरवले. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमात भावुक आणि गौरवास्पद वातावरण निर्माण झाले होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे गव्हर्नर रो. सुरेश साबू उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून यशस्वी उद्योजक राजेश मालपाणी, असिस्टंट गव्हर्नर रो. विनोद पटणी, डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी रो. राजेंद्र अग्रवाल आणि पब्लिक इमेज डायरेक्टर रो. रविंद्र बनकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात पाच कुटुंबांचा सन्मान करण्यात आला, ज्यांनी अनेक अडचणींवर मात करत आपल्या मुलांना विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी बनवले. या मुलांनी प्रशासन, महसूल, पोलीस, वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन्मानित पालकांमध्ये पालघरचे अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांच्या मातोश्री श्रीमती भागीरथीबाई गंगाधर फटांगरे, मुंबईचे जॉइंट कमिशनर, इन्कम टॅक्स एकनाथ अभंग यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणीताई गणपत अभंग, आयपीएस अधिकारी मंगेश खिलारी यांचे पालक संगिता व पाराजी खिलारी, महिंद्रा कंपनीच्या प्रॉडक्शन मॅनेजर इंजि. मनिषा भालके यांच्या पालक सिता व बबन भालके आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, एम.डी. (गोल्ड मेडलिस्ट) डॉ. ताईबाई गावडे यांच्या पालक सिंधुबाई व देवराम गावडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या गौरवगीताने झाली, रो. राजेंद्र खोसे यांनी आपल्या मधुर आवाजात हे गीत सादर केले. यानंतर, यशस्वी मुलांनी आपल्या पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या खडतर प्रवासातील आठवणी उपस्थितांसमोर कथन केल्या.

यावेळी बोलताना राजेश मालपाणी म्हणाले की, “आई-वडील हेच आपले खरे मार्गदर्शक आणि गुरु असतात. त्यांच्या कष्टाचा आणि मार्गदर्शनाचा आदर केल्यास कोणतेही ध्येय साध्य करता येते.” रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रो. सुरेश साबू यांनी एकलव्य आणि द्रोणाचार्य यांच्या उदाहरणातून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले. त्यांनी संगमनेर रोटरी क्लबच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष रो. साईनाथ साबळे, सचिव रो. विश्वनाथ मालाणी, खजिनदार रो. विकास लावरे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे आणि प्रकल्प प्रमुख रो. सुनिल घुले यांच्यासह रो. महेश जाजू, रो. राजेंद्र खोसे, रो. नरेंद्र चांडक, रो. दीपक मणियार, रो. अजित काकडे, रो. रविंद्र पवार, रो. संजय लाहोटी, रो. अरविंद कासट, रो. पवनकुमार वर्मा, रो. डॉ. विनायक नागरे, रो. योगेश गाडे, रो. आनंद हासे, रो. डॉ. किशोर पोखरकर, रो. अमित पवार, रो. संतोष आहेर, रो. संकेत काजळे, रो. रवि ढेरंगे, रो. प्रमोद मणियार, रो. ओंकार सोमाणी, रो. मधुसूदन करावा, रो. सचिन पलोड, रो. रोहित नावंदर, रो. सौरभ म्हाळस, रो. मनमोहन वर्मा, सौ. मनोरमा साबळे आदी रोटरी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रो. संजय राठी व रो. भारतभूषण नावंदर यांनी केले.

या सोहळ्याला सन्मानित पालकांचे कुटुंबीय, सुर्या करिअर अकॅडमीचे विद्यार्थी, रोटरी क्लबचे सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्षातून यशाकडे जाणार्‍या या प्रेरणादायी कथा ऐकून उपस्थितांना गहिवरून आले आणि त्यांच्या मनात सन्मान व आदराची भावना दाटून आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,349
रोटरी क्लब सन्मान सोहळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस…

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.