Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धनादेश बाउन्स प्रकरणी आरोपीला दोन महिन्यांचा कारावास, दंडाच्या रकमेसह ३७ लाख रुपये देण्याचा आदेश
न्यायालय

धनादेश बाउन्स प्रकरणी आरोपीला दोन महिन्यांचा कारावास, दंडाच्या रकमेसह ३७ लाख रुपये देण्याचा आदेश

रक्कम एका महिन्याच्या आत दिली नाही, तर त्यांना आणखी एक महिना साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/06/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी

आर्थिक व्यवहारापोटी दिलेला धनादेश न वटता परत आल्याने यासंदर्भात दाखल खटल्यात संगमनेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मच्छिंद्र सदाशिव नवले याला दोन महिन्यांचा साधा कारावास आणि फिर्यादीला दंडाच्या रकमेसह ३७ लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

रमेश रंगनाथ सातपुते हे हवाई दलातून निवृत्त झालेले अधिकारी असून, सध्या ते संगमनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नातेवाईक असलेल्या मच्छिंद्र सदाशिव नवले यांनी गाळा आणि शेती घेण्यासाठी सातपुते यांच्याकडून सुरुवातीला १६ लाख रुपये आणि नंतर १९ लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम सन २०२१ मध्ये घेण्यात आली होती आणि ती २८ फेब्रुवारी २०२२ रोजी परत करण्याचे आश्वासन नवले यांनी दिले होते.

हा व्यवहार बिनव्याजी उसनवारीचा असल्याने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी यासंदर्भात एक नोटरी करारनामा करण्यात आला होता. या करारनाम्यानुसार, नवले यांनी सातपुते यांना युनियन बँक ऑफ इंडियाच्या घुलेवाडी शाखेचे पाच धनादेश दिले होते. २८ मार्च २०२२ रोजी नवले हे ३५ लाख रुपये परत करून धनादेश परत घेणार होते. मात्र, त्या दिवशी नवले यांनी सातपुते यांना रोख रक्कम देण्याऐवजी ३५ लाख रुपयांचा एक धनादेश दिला.

सातपुते यांनी नवले यांनी दिलेला ३५ लाख रुपयांचा धनादेश बँकेत सादर केला असता, ‘पेमेंट स्टॉप’ (Payment Stop) या शेऱ्यासह तो वटला नाही आणि परत आला. धनादेश अनादर झाल्याने रमेश सातपुते यांनी मच्छिंद्र नवले यांच्या विरोधात कलम १३८ नुसार न्यायालयात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी संगमनेर न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांच्यासमोर सुनावणी झाली. फिर्यादी रमेश सातपुते यांच्या वतीने ॲड. अनिल घुले यांनी युक्तिवाद केला, तर आरोपी मच्छिंद्र नवले यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने आरोपी मच्छिंद्र सदाशिव नवले (रा. मालदाड, ता. संगमनेर) याला कलम १३८ आणि ‘फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३’ च्या कलम २५५/२ अन्वये दोन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

याव्यतिरिक्त, न्यायालयाने आरोपी नवले याला फिर्यादी रमेश सातपुते यांना धनादेशाची रक्कम ३५ लाख रुपये आणि अतिरिक्त नुकसान भरपाई म्हणून २ लाख रुपये, असे एकूण ३७ लाख रुपये एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले. जर नवले यांनी ही रक्कम एका महिन्याच्या आत दिली नाही, तर त्यांना आणखी एक महिना साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,442
चेक बाउन्स धनादेश अनादर शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.