Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी प्रकरणी ३ दोषींना न्यायालयाने सुनावली कारावासाची शिक्षा
न्यायालय

सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी प्रकरणी ३ दोषींना न्यायालयाने सुनावली कारावासाची शिक्षा

तक्रारदार सुभाष भिमाजी खेमनर, तपासी अंमलदार तात्याराव यादवराव वाघमारे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/07/2025Updated:05/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने सन २०१४ मधील घरफोडी आणि चोरीच्या एका प्रकरणात तीन आरोपींना संगमनेरचे ४ थे दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी जि. व. भेंडे साहेब यांनी दोषी ठरवले आहे. यात मुख्य आरोपी किशोर सावळेराम फुलवर आणि अक्षय बाळासाहेब डहाळे हे फरार असून या दोघांना प्रत्येकी दोन वर्ष, अमोल नंदुशेठ कुलथे याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी: २१ ऑगस्ट २०१४ रोजी सुभाष भिमाजी खेमनर यांनी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सकाळी ९:४५ वाजता ते आणि त्यांच्या पत्नी शाळेत गेले असता, सायंकाळी ५:३० वाजता घरी परतल्यावर त्यांना त्यांच्या बंगल्याच्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापलेले आणि काचा फुटलेल्या दिसल्या. दुसऱ्या बेडरूममध्ये कपाटातून ६०,०००/- रुपये रोख आणि ८.५ तोळे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या तक्रारीनुसार, आश्वी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४५४, ३८० आणि ४११ सहकलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण करून एकूण तीन आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारच्या वतीने सरकारी वकील प्रणव भामरे यांनी काम बघितले.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान, आरोपी क्र. १ किशोर फुलवर आणि आरोपी क्र. ३ अक्षय डहाळे हे गैरहजर राहिले, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ८२ व ८३ प्रमाणे जाहीरनामे काढण्यात आले. आरोपी क्र. २ अमोल कुलथे हजर असल्याने, त्याचा खटला वेगळा करून त्याच्याविरुद्ध पुरावा नोंदवण्यात आला, तर फरार आरोपींविरुद्ध कलम २९९ प्रमाणे पुरावा नोंदवला गेला.

तक्रारदार सुभाष भिमाजी खेमनर, तपासी अंमलदार तात्याराव यादवराव वाघमारे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सादर केलेले तोंडी आणि लेखी पुरावे तसेच युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने या खटल्यामध्ये तिन्ही आरोपींना दोषी ठरविले. फरार आरोपी किशोर सावळेराम फुलवर याला भादंवि कलम ४५४ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि ५००/- रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास. तसेच भादंवि कलम ३८० अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि ५००/- रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास तर आरोपी अमोल नंदुसेठ कुलथे याला भादंवि कलम ४११ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि ५००/- रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची तर फरार आरोपी अक्षय बाळासाहेब डहाळे याला भादंवि कलम ४११ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि ५००/- रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

तसेच तपासा दरम्यान या प्रकरणातील जप्त केलेला मुद्देमाल सोन्याची लगड, अंगठी, नेकलेस, टॉप्स, मंगळसूत्र, मणी, वेल आणि रोख रक्कम ६०,०००/- रुपये सुभाष भिमाजी खेमनर यांना सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,073
न्यायालय शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.