Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आरोपी सात वर्षांनी गजाआड
गुन्हेगारी

बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आरोपी सात वर्षांनी गजाआड

शिक्षा भोगत असताना विठ्ठल रजेवर बाहेर आला, परंतु त्यानंतर तो कारागृहात परतला नाही आणि पोलिसांचा ताबा चुकवून फरार झाला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Close up of male hands in bracelets behind back
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका कैद्याला पोलिसांनी तब्बल सात वर्षांनी अटक केली आहे. विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे (रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रजेवर बाहेर आल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन तो फरार झाला होता.

२०१४ मध्ये बीड येथे ही धक्कादायक घटना घडली होती. विठ्ठलला त्याच्या बहिणीचे प्रेमप्रकरण आणि प्रियकरासोबतचे लग्न मान्य नव्हते. यातून त्याने बहिणीला आणि तिच्या प्रियकराला रुग्णालयातच विष पाजून प्राणघातक हल्ला केला होता. दुर्दैवाने या हल्ल्यात बहिणीचा मृत्यू झाला, तर प्रियकर बचावला. या गुन्ह्यासाठी विठ्ठलला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

शिक्षा भोगत असताना विठ्ठल रजेवर बाहेर आला, परंतु त्यानंतर तो कारागृहात परतला नाही आणि पोलिसांचा ताबा चुकवून फरार झाला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी एक विशेष तपास पथक नियुक्त केले होते. उपनिरीक्षक महेश जाधव, हवालदार गहिनीनाथ बावनकर आणि अंमलदार राम पवार यांच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर फरार विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे याला गुरुवारी सायंकाळी शिताफीने ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,254
गुन्हेगारी फरार शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.