Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संस्थेकडून धनादेशाचा गैरवापर: न्यायालयाने कर्जदार आरोपी महिलेची केली निर्दोष मुक्तता!
न्यायालय

संस्थेकडून धनादेशाचा गैरवापर: न्यायालयाने कर्जदार आरोपी महिलेची केली निर्दोष मुक्तता!

आरोपी शारदा बाळू जगधने यांच्या वतीने ॲड. शोण दीपक थोरात यांनी काम बघितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2025Updated:31/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी:

कर्जदाराकडून कोरा धनादेश घेऊन तो कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा करून धनादेशाचा अवमान झाला या कारणासाठी न्यायालयात कर्जदार महिलेविरुद्ध वसुली दावा दाखल करणाऱ्या संस्थेला संगमनेर न्यायालयाने दिलासा न देता कर्जदार महिलेची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

शारदा बाळू जगधने यांनी सन 2019 मध्ये मुंबईस्थित सर्वग्राम फिनकेअर प्रा. ली. या कंपनीच्या संगमनेरमधील कार्यालयाकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची थकबाकी 2,35,241/- रुपये झाली होती. हे कर्ज फेडण्यासाठी आरोपी कर्जदार महिलेने संस्थेला सदरचा धनादेश दिल्याचे तसेच या खटल्यासाठी संबंधित कंपनीने व्यवस्थापकाला प्राधिकार पत्र दिल्याचे सांगत न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. आरोपी शारदा बाळू जगधने यांच्या वतीने ॲड. शोण दीपक थोरात यांनी काम बघितले. त्यांना ॲड. प्रमोद शिंदे व ॲड. आकाश जाधव यांनी सहकार्य केले. ॲड. थोरात यांनी खटल्यातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

थोरात यांनी व्यवस्थापकाकडे असलेले अधिकार पत्र हे अनधिकृत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास जाणून दिले. तसेच आरोपीने दिलेला चेक हा कर्जाच्या देण्यापोटी दिलेला नसून संस्थेने आरोपीकडून वापर करण्यात आलेला धनादेश कोऱ्या स्वरूपात घेतला असल्याचे न्यायालयाला सांगितले. दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मधील अफिडेविट मध्ये असलेल्या त्रुटी त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

आरोपी कर्जदार महिला नियमितपणे कर्जाचे हप्ते भरत होती आणि कोविड 19 च्या लॉकडाऊन दरम्यान कर्जाची थकबाकी झाली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या कर्जदार महिलेकडे येऊन रोख रकमेत पैसे वसूल केले. असे असताना देखील तक्रारदाराने सुरक्षा धनादेशाचा गैरवापर केला आहे आणि तक्रारदार कंपनीच्या संचालक मंडळाने कोणताही वैध ठराव मंजूर न करता खोटी तक्रार दाखल केली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

संस्थेच्या आणि आरोपींच्या वकिलांनी आपल्या युक्तीवादा दरम्यान विविध खटल्यांचे दाखले दिले. संस्थेच्या आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांनी दिलेल्या 21 पानांच्या निकालपत्रात आरोपी महिलेचे निर्दोष मुक्तता केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,789
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय धनादेश अनादर निर्णय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.