Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माहेरून २० लाख रुपयांच्या मागणीसाठी विवाहितेला जीव गमवावा लागत असेल तर… आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली खंत
गुन्हेगारी

माहेरून २० लाख रुपयांच्या मागणीसाठी विवाहितेला जीव गमवावा लागत असेल तर… आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली खंत

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

 

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

माहेराहून २० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने आमदार रोहित पवार यांनी समाजाने यातून कोणताही धडा घेतला नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा झेंडगे आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी २ मे २०२४ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी स्नेहाकडे कंपनी चालवण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. या पैशांसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला.

https://x.com/RRPSpeaks/status/1954558051442434467?t=uA3sdevQQ7sWZSaRCYw82A&s=19

छळाला कंटाळून स्नेहाने याआधीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, सासरचे नातेवाईक भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला धमकावून तक्रार मागे घ्यायला लावली. त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाला बोलावल्यास त्याला जीवे मारण्याची धमकीही तिला देण्यात आली होती. या त्रासाला कंटाळून स्नेहाने ९ ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

रोहित पवारांची भावनिक पोस्ट या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले आहे की, वैष्णवी हगवणे प्रकरणात समाजाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात एका विवाहितेला अशा प्रकारे जीव गमवावा लागत असेल तर या घटनेला कारणीभूत असलेल्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

स्नेहाच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी तिचा पती विशाल झेंडगे आणि इतर नातेवाईकांवर भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२) सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 545
आत्महत्या रोहित पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.