Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आश्वी पाठोपाठ संगमनेरच्या जाखुरीमध्ये महिलेची हत्या, संशयित आरोपी पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात
गुन्हेगारी

आश्वी पाठोपाठ संगमनेरच्या जाखुरीमध्ये महिलेची हत्या, संशयित आरोपी पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर, प्रतिनिधी:

अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेरच्या आश्वी बुद्रुक येथे समोर आल्याचे वृत्त समोर येऊन काही तास उलटत नाही तोच तालुक्यातील जाखुरी येथे महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे.

संगीता भारत मोरे (वय ४०, रा. नादनठाण, ता. वैजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती भारत मोरे याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

संगीता मोरे, त्यांचे पती भारत मोरे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती जाखुरी येथील जावई सोमनाथ सुरशे यांच्या घरी मुक्कामी आले होते. रविवारी रात्री सर्व कुटुंबियांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर संगीता मोरे झोपी गेल्या. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या जंगलात आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह पोलिसांनी, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या गळ्यावर खुणा असल्याने हा खून झाल्याचा तसेच पती-पत्नीत वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले. ‘सीमा’ नावाच्या श्वानाने आरोपीच्या चपलांचा वास घेत घरापासून ते मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतचा माग काढला.

पोलिसांनी तात्काळ पती भारत मोरे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत आलेल्या अनोळखी व्यक्तीचा या गुन्ह्यात सहभाग आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,262
क्राईम खून गुन्हेगारी हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.