Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला दहा वर्षाचा कारावास, संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
न्यायालय

महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला दहा वर्षाचा कारावास, संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/08/2025Updated:20/08/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर, प्रतिनिधी: अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाल्याने संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

बाळासाहेब जगन्नाथ रोकडे (वय ३२ वर्ष रा. श्रीरामनगर संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी निर्णय जाहीर करत आरोपीला खटल्यात दोषी ठरविले.

१७ मार्च २०१९ रोजी पीडित अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणी मैत्रिणीचे बँकेत काम असल्याचे कारण सांगून तिच्यासोबत संगमनेर मधील युनियन बँकेत गेली होती. मात्र ही घरी न परतल्याने मैत्रिणीकडे चौकशी केली असता तिने बँकेतील काम झाल्यानंतर पीडित तरुणी घरी गेल्याचे सांगितले. मात्र उशिरापर्यंत तरुणी घरी न परतल्याने तिचा शोध घेतला असता ती कोठेही आढळून आली नाही.

अल्पवयीन तरुणी आढळून आल्याने तिच्या आईने या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पीडित मुलीने अनोळखी नंबर वरून आईला फोन करत आपण नालासोपारा येथे असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तिच्या आईने तिला जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गेली त्यानंतर संगमनेर पोलिसांच्या मदतीने तिला संगमनेर येथे आणण्यात आले होते. 

पोलिसांनी तरुणीचा जबाब घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. तरुणीची मैत्रीण व आरोपीने तिला बँकेत न नेता गार्डनमध्ये नेले होते. तेथे तिला ज्यूस मधून कोणते तरी मादक द्रव्य पिण्यास दिल्याने तिला त्रास होऊ लागला व चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान तिला जाग आली असता ती पुण्यातील एका लॉजवर होती. त्यानंतर जेवण करून ती पुन्हा झोपी गेली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्या पायाला ओरखडले गेल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तरुणीने मैत्रिणीला घरी जायचे असल्याचे सांगितले. 

त्यानंतर पीडित तरुणी, तिची मैत्रीण, आरोपी आणि त्याचा मित्र असे चौघेजण रेल्वेने नालासोपारा येथे गेले. तेथे आरोपीने रात्री तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती पीडित तरुणीने दिल्यानंतर पुरवली जबाबाच्या आधारे आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६, पोक्सो ४, ६ या वाढीव कलमातर्गत गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे यांनी या प्रकरणी तपास करून न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते.

न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पीडित तरुणीसह महिला वैद्यकीय अधिकारी लोहारे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील गवते यांनी आरोपीने पीडित तरुणीवर पुणे आणि नालासोपारा येथे अत्याचार केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी या खटल्यात आरोपी बाळासाहेब जगन्नाथ रोकडे याला विविध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावास, सात हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, दिपाली राहणे, पंडित व साबळे यांनी सरकार पक्षाला मदत केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,915
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय निर्णय न्यायालय शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.