Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेअर मार्केटमध्ये मोठा गंडा: गुंतवणूकदारांचे ५० लाख रुपये बुडाले
गुन्हेगारी

शेअर मार्केटमध्ये मोठा गंडा: गुंतवणूकदारांचे ५० लाख रुपये बुडाले

गिते यांच्यासह स्नेहा जोशी, शीतल चव्हाण, आनंद जोशी, आणि अजिनाथ पाडळकर यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला ३०-४०% नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अहिल्यानगर: शेअर मार्केटमध्ये आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगरमध्ये तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विशाल तुकाराम चव्हाण आणि कृष्णा दगडू शिंदे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये, अर्जुन गिते यांची २५.५ लाख रुपये आणि इतर तीन जणांची २५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

तक्रारदार अर्जुन गिते यांची २०२२ मध्ये आरोपी विशाल चव्हाण याच्याशी ओळख झाली होती. विशालने ‘व्ही.सी. इन्व्हेस्टमेंट’ या नावाने शेअर मार्केट कंपनी सुरू केल्याचे सांगितले. त्याने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर नफ्याचे आकर्षक व्हिडिओ दाखवून गिते यांच्यासह स्नेहा जोशी, शीतल चव्हाण, आनंद जोशी, आणि अजिनाथ पाडळकर यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला ३०-४०% नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले.

विशालच्या आश्वासनांना बळी पडून अर्जुन गिते यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २०२४ या काळात २५.५ लाख रुपयांची मोठी रक्कम गुंतवली. विशालने सुरुवातीला १०% परतावा देण्याचे आश्वासन दिले, परंतु फेब्रुवारी २०२५ नंतर त्याने परतावा देणे बंद केले. गिते यांनी आपली रक्कम परत मागितल्यावर विशालने शेअर मार्केटमध्ये मंदी असल्याचे कारण सांगून टाळाटाळ केली. मार्च २०२५ मध्ये त्याने नोटरी करारनामा करूनही पैसे दिले नाहीत. या गुन्ह्यात सामील असलेला दुसरा आरोपी कृष्णा दगडू शिंदे याने निंबोडी येथील प्लॉट विक्रीचे आमिष दाखवूनही पैसे परत केले नाहीत.

या टोळीने अशाच प्रकारे ४०-५० गुंतवणूकदारांना फसवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वारुळे अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 666
फसवणूक शेअर मार्केट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.