Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » युट्युबवर मराठा समाजाची बदनामी, संगीता वानखेडे विरोधात संगमनेरात गुन्हा दाखल; सकल मराठा समाजाने वानखेडेचा नोंदविला निषेध
गुन्हेगारी

युट्युबवर मराठा समाजाची बदनामी, संगीता वानखेडे विरोधात संगमनेरात गुन्हा दाखल; सकल मराठा समाजाने वानखेडेचा नोंदविला निषेध

सध्या वानखेडे यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/09/2025Updated:10/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर- 

सोशल मीडियावर मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी यूट्यूबवरील ‘संगीता वानखेडे’ या महिलेविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, संगमनेरातून त्यांच्या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

या संदर्भात प्रकाश कडलग यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 07 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी यूट्यूबवर ‘स्पष्ट मत LIVE’ या चॅनलवर संगीता वानखेडे यांचा एक व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये वानखेडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चाविषयी बोलताना, मराठा महिलांची बदनामी करणारी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली. त्यांच्या या विधानामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. निवेदनासोबत या महिलेविरोधात 17 तक्रार अर्ज देण्यात आले आहे.

या प्रकरणी संगमनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी अर्चनाताई बालोडे, पद्मा थोरात, प्रमिला अभंग, शीतल भुसाळ, अमृता राऊत, बेबीताई थोरात, सुनीता कांदळकर, मीना पटेल, सपना मंडलिक, छाया देशमुख, उज्वला गोडगे, मनीषा शिंदे, वैशाली बर्गे या महिलांसह सुरेश झावरे, तात्या कुटे, सत्यजित थोरात, सुरेश थोरात, सौरभ कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, संगीता वानखेडे पैशांसाठी कोणाबद्दलही बदनामीकारक वक्तव्य करत आहेत. त्यांची भाषा अत्यंत अभद्र आणि समाजात तेढ निर्माण करणारी आहे. महिला असूनही त्या इतर महिलांबद्दल बेताल वक्तव्य करत असल्याने महिलांमध्येही तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अर्चनाताई बालोडे यांनी वानखेडे यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, ज्यावेळी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी आंदोलन करत आहे, त्याच वेळी या महिलेने मराठा समाजाविरुद्ध खालच्या पातळीचे वक्तव्य केले आहे. मराठा समाजासोबतच ओबीसी समाजानेही त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. पैसे घेऊन कोणाचीही बदनामी करणारी ही महिला महाराष्ट्राला कलंक आहे. पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी.

सध्या वानखेडे यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,059
गुन्हा संगमनेर पोलीस संध्या वानखेडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.