संगमनेर: राजापूर (ता. संगमनेर) येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेल्या वैभव हासे याच्या पत्नीसह सासरच्या चार जणांना संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
२५ ऑगस्ट २०२५ रोजी राजापूर येथील रहिवासी वैभव नवनाथ हासे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मृत वैभव यांची पत्नी माधुरी वैभव हासे, सासरे शिवाजी तुकाराम वाडेकर, बाळासाहेब तुकाराम वाडेकर, मेहुणा तुषार शिवाजी वाडेकर (सर्व रा. चास-पिंपळदरी, ता. अकोले) यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सर्व आरोपींनी संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात ॲड. शोण थोरात व ॲड. सदानंद पोखरकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.
सदर अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान, ॲड. शोण थोरात यांनी आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर गुन्ह्यात आरोपींचा कोणताही प्रत्यक्ष सहभाग नाही. तसेच, मयत वैभव यांची पत्नी माधुरी ही स्वतः कौटुंबिक हिंसाचाराची बळी असून ती पतीपासून विभक्त राहत आहे. केवळ माधुरी व तिच्या कुटुंबाला त्रास देण्याच्या हेतूने हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी महत्त्वपूर्ण आदेश करत सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. आरोपींच्या बाजूने ॲड. शोण थोरात आणि ॲड. सदानंद पोखरकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. प्रमोद शिंदे व ॲड. आकाश जाधव यांनी कायदेशीर सहकार्य केले.
आत्महत्या प्रकरणात पत्नी व सासरच्यांना अटकपूर्व जामीन… जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
आरोपींच्या बाजूने ॲड. शोण थोरात आणि ॲड. सदानंद पोखरकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. प्रमोद शिंदे व ॲड. आकाश जाधव यांनी कायदेशीर सहकार्य केले.



संगमनेर: 
या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सर्व
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रे