Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २ वाईन शॉपवर छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २ वाईन शॉपवर छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

सणासुदीच्या काळात बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशाच प्रकारे काटेकोर कारवाया सुरू राहतील. शहरातील कोणतीही अवैध विक्री सहन केली जाणार नाही. नागरिकांनी संशयास्पद हालचालीबाबत विभागाला तात्काळ कळवावे, असे आवाहनही केले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

दसरा आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त घोषित केलेल्या मद्य विक्री बंदीच्या दिवशीही नियम मोडत अवैध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. विभागाने श्रीरामपूर शहरातील दोन वाईन शॉपवर छापे टाकून १२,४४,३४५/- किमतीचा अवैध मद्यसाठा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत किशोर भूतकर, अनिल भूतकर, आणि अरुण अक्षय काळे या तिघांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे शहरातील अवैध मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, छाप्यांमध्ये सापडलेले ‘सेंट्रल वाईन्स शॉप’ हे एका माजी नगरसेवकाच्या नावावर असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एकाच दिवशी श्रीरामपूर शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ‘नितीन वाईन्स’ आणि ‘सेंट्रल वाईन्स शॉप’ मधून बंदीच्या दिवशीही मद्याचा साठा विक्रीसाठी बाहेर काढण्यात आला होता. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाईची योजना आखली.

या छाप्यात देशी आणि विदेशी मद्याचा अवैध साठा, त्यासंबंधित बिलबुक, तसेच वाहतुकीसाठी वापरली जाणारी साधने जप्त करण्यात आली. एकूण ₹१२,४४,३४५/- किमतीचा दारूचा साठा आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे की, या दुकानांतून बंदीच्या दिवशीही मद्य विक्री केली जात होती.

या कारवाईतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेंट्रल वाईन शॉप हे एका माजी नगरसेवकाच्या नावावर असल्याचे उघडकीस आले आहे. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या माजी नगरसेवकांच्याच दुकानातून बंदीच्या दिवशी मद्यविक्री होत असल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध मद्यविक्री बंदीचे उल्लंघन, अवैध साठा ठेवणे आणि विक्री याबाबत संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त सागर धोमकर, अहिल्यानगर जिल्ह्याचे अधीक्षक प्रमोद सोनवणे, उपअधीक्षक प्रवीणकुमार तेली, तसेच श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक २ चे निरीक्षक अनुपकुमार देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर, जवान उद्धव काळे, सचिन बटुळे, महिला जवान आर. काळापहाड आदींच्या पथकाने ही धडक कारवाई केली.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक २ चे निरीक्षक अनुपकुमार देशमाने यांनी स्पष्ट केले की, सणासुदीच्या काळात बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशाच प्रकारे काटेकोर कारवाया सुरू राहतील. शहरातील कोणतीही अवैध विक्री सहन केली जाणार नाही. नागरिकांनी संशयास्पद हालचालीबाबत विभागाला तात्काळ कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,130
कारवाई राज्य उत्पादन शुल्क वाईन शॉप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.