Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरला महानगरांची झळाळी! ‘मालपाणी मल्टिप्लेक्स’चे दिमाखदार उद्घाटन; दोन स्वतंत्र पडद्यांमुळे मनोरंजनाची मोठी उणीव दूर
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरला महानगरांची झळाळी! ‘मालपाणी मल्टिप्लेक्स’चे दिमाखदार उद्घाटन; दोन स्वतंत्र पडद्यांमुळे मनोरंजनाची मोठी उणीव दूर

येथे थ्री-डी (3D) आणि सामान्य अशा दोन स्वतंत्र पडद्यांवर रसिकांना नवनवीन चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यात झपाट्याने विकास करत असलेल्या संगमनेर शहराची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक मोठी गरज आता पूर्ण झाली आहे. दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना लोणी किंवा नाशिक गाठावे लागत होते, मात्र ही कुचंबना आता थांबली आहे. संगमनेरकरांची वाढती मागणी आणि मनोरंजन क्षेत्रातील उणीव लक्षात घेत, मालपाणी उद्योग समूहाने शहरात अत्याधुनिक मालपाणी मल्टिप्लेक्स सिनेमागृह उभारले आहे.

अगदी महानगरांच्या तोडीच्या सुविधांनी सज्ज असलेल्या या मल्टिप्लेक्सचे शानदार उद्घाटन शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोंबर) मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती ललितादेवी व श्रीमती सुवर्णाकाकी मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून (शनिवार) हे चित्रपटगृह नवीन चित्रपटांसह लोकसेवेत रुजू झाले असून, संगमनेरमध्ये मनोरंजनाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

दोन स्वतंत्र पडद्यांची रचना आणि राजेशाही सुविधा- संगमनेरात जुनी चित्रपटगृहे टप्प्याटप्प्याने बंद झाल्यानंतर रसिकांची मोठी गैरसोय होत होती. मालपाणी परिवाराने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही सूप्तइच्छा पूर्ण करताना पुणे, मुंबईसारख्या महानगरांच्या तोडीचे दोन अत्याधुनिक चित्रपटगृह एकाच ठिकाणी सुरू केले आहेत. येथे थ्री-डी (3D) आणि सामान्य अशा दोन स्वतंत्र पडद्यांवर रसिकांना नवनवीन चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.

कॉम्प्लेक्स सिनेमाच्या सहकार्याने बॉलीवूड-हॉलीवूडमधील प्रत्येक नवा चित्रपट आता संगमनेरात त्याच दिवशी पाहणे शक्य होणार आहे. प्रत्येकी दीडशे आसन क्षमता असलेल्या या चित्रपटगृहांमध्ये अत्याधुनिक वातानुकुलीत यंत्रणेसह अत्यंत आरामदायक आणि राजेशाही आसन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

विशेषतः डिजिटल साऊंड इफेक्ट्समुळे चित्रपट पाहण्याचा खरा रोमांच अनुभवता येणार आहे. आकर्षक अंतर्गत रचना आणि वातावरणामुळे ‘मालपाणी मल्टिप्लेक्स’ संगमनेरकरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी, ‘जन्मभूमीचा विकास व्हावा, तिच्या सौंदर्यात भर पडत रहावी यासाठी मालपाणी परिवाराने नेहमीच पुढाकार घेतला आहे. चित्रपट रसिकांची गरज लक्षात घेवून आपल्याही नागरिकांना अत्याधुनिक सुविधांसह चांगले चित्रपटगृह द्यावे या भावनेतून मालपाणी मल्टिप्लेक्सची निर्मिती झाली,’ असे सांगितले.

मनीष मालपाणी यांनी यावेळी जुन्या चित्रपटगृहांच्या आठवणींना उजाळा देत, ‘संगमनेर एक सांस्कृतिक शहर आहे, त्यामुळे सर्वकाही असताना चित्रपटगृहाची उणीव खटकत होती. ती आता मालपाणी मल्टिप्लेक्सच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. रसिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे आवाहन केले. गिरीष मालपाणी यांनी या उपक्रमाचा उल्लेख संगमनेरकरांसाठीची ‘दिवाळीची भेट’ असा करत आनंद व्यक्त केला. तसेच, दर आठवड्याला नवनवीन चित्रपट प्रदर्शित होतील आणि ऑनलाईन तिकीट आरक्षित करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ व आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथीली तांबे यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दूर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत मालपाणी परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम तिवारी यांनी केले, तर डॉ. संजय मालपाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,301
मालपाणी मल्टिप्लेक्स शुभारंभ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.