Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी १२ जानेवारीला महामार्गावर ‘चक्काजाम’; बोटा येथे रेल्वे स्टेशनच्या मागणीसाठी जनआंदोलन तीव्र
सामाजिक

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी १२ जानेवारीला महामार्गावर ‘चक्काजाम’; बोटा येथे रेल्वे स्टेशनच्या मागणीसाठी जनआंदोलन तीव्र

आंदोलनाच्या दिवशी संगमनेर व अकोले तालुक्यातील पठार भागातील सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Kochi, Kerala, India -March 2, 2021 a train moving with electric support through the indian railway track
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर- 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. विकास क्रांती सेनेसह विविध रेल्वे कृती समित्यांनी येत्या १२ जानेवारीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्काजाम’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 

या आंदोलनाच्या नियोजनासाठी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्वांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे आपल्या मागण्या कळवल्या असून आता १२ जानेवारीच्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव, जुन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील जनता या बहुउद्देशीय पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून अहिल्यानगर, शिर्डी, सिन्नर ते नाशिक अशा नवीन मार्गाची घोषणा केल्याने स्थानिक जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विकास क्रांती सेनेच्या प्रमुखांच्या मते, गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही जनतेची दिशाभूल होत असल्याने आता तिसऱ्या टप्प्यातील मोठे आंदोलन छेडण्यात येत आहे.

या लढ्यात बोटा येथे रेल्वे स्टेशन उभारण्याची मागणी प्रामुख्याने लावून धरण्यात आली आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या बोटा येथे स्टेशन झाल्यास या भागातील कृषी आणि पर्यटन क्षेत्राला मोठी भरभराट मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत रेल्वे प्रकल्पाबाबत ठोस निर्णय येत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला असून, आंदोलनाच्या दिवशी संगमनेर व अकोले तालुक्यातील पठार भागातील सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीसाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये इंजिनिअर संतोष फापाळे, समाजसेवक भगवानदादा काळे, सरपंच जालिंदर गागरे, सरपंच पांडुरंग शेळके, सुहास वाळुंज, संभाजी बोडके, स्वप्नील हलवळे, गणेश हलवळे, किशोर फापाळे, राहुल ठेंबरे, मुनीर शेख, चंद्रकांत गोंदके, शेखर काळे, रमेश आहेर, पूजाताई सोनवणे, पत्रकार सतीश फापाळे, बाळासाहेब कुऱ्हाडे, पत्रकार बबन शेळके, संदीप दातखिळे, अनंतराव चौगुले, चंद्रकांत फापाळे, शांता घुले, भास्कर भारती, तसेच दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, शिवमुद्रा फाउंडेशन आणि छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 855
जन आंदोलन नाशिक पुणे रेल्वे बोटा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.