Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चेक बाऊन्स प्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला कारावासाची शिक्षा
न्यायालय

चेक बाऊन्स प्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला कारावासाची शिक्षा

न्यायालयाने आरोपीला तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि दोन लाख रुपये दंड ठोठावला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

व्यावसायिक कामासाठी घेतलेली हातउसनवार रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश (चेक) बँकेत न वटल्याने संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांच्या न्यायालयाने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी ज्ञानेश्वर माधव वर्पे हे संगमनेर शहरात ‘वर्पे इन्श्युरन्स अँड मल्टी सर्विसेस’ नावाचा व्यवसाय करतात. आरोपी सागर भाऊसाहेब गोपाळे (वय ३८ वर्ष, रा. धांदरफळ बुद्रुक) यांचा ‘श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट’ नावाचा व्यवसाय असून गाड्यांच्या विम्याच्या कामामुळे या दोघांचा परिचय झाला होता. जून २०२२ मध्ये आरोपीने आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी फिर्यादीकडून १ लाख २५ हजार रुपये हातउसनवार घेतले होते आणि ही रक्कम दोन महिन्यांत परत करण्याचे आश्वासन दिले होते.

ठरलेली मुदत संपल्यानंतर फिर्यादीने रक्कमेची मागणी केली असता आरोपीने येस बँकेचा १ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश दिला. फिर्यादीने सदर चेक बँकेत जमा केला असता तो ‘खाते बंद’ (Account Closed) असल्याच्या शेऱ्यासह दोनदा परत आला. यानंतर फिर्यादीने वकिलामार्फत नोटीस पाठवूनही आरोपीने रक्कमेची पूर्तता न केल्याने न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपीने आपण पैसे व्याजाने घेतले होते आणि ते विविध हप्त्यांमध्ये परत केले असल्याचा बचाव मांडला. मात्र, रक्कम परत केल्याचा कोणताही ठोस पुरावा, बँक पावती किंवा साक्षीदार आरोपीला न्यायालयात सादर करता आला नाही. उलट उलटतपासणी दरम्यान आरोपीने फिर्यादीशी तडजोड करण्याची आणि विषय संपवण्याची तयारी दर्शवली, ज्यावरून रक्कम देणे बाकी असल्याचे अप्रत्यक्षपणे सिद्ध झाले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे तपासून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांनी आरोपी सागर भाऊसाहेब गोपाळे याला कलम १३८ अन्वये दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि दोन लाख रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंडाची रक्कम दोन महिन्याचा आत नाही दिल्यास आरोपीला एक महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. न्यायालयाने आदेश केलेल्या दोन लाख रुपयांपैकी १ लाख ७५ हजार रुपये फिर्यादीला व २५ हजार रुपये सरकार जमा करण्याचे आदेश दिले आहे.

या प्रकरणात फिर्यादीतर्फे वकील श्री. व्ही. आर. पगारे यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. सुनिता जाधव, ॲड. मोहिनी जगताप व ॲड. मनीषा गुंजाळ यांनी मदत केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,189
चेक बाउन्स शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.