Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अडथळे संपले भक्तीचा मार्ग सुकर, देवगड-देवतळे शिवरस्ता एका वर्षात पूर्ण; … प्रशासकीय गतिमानता आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे खंडोबा भक्तांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली
सामाजिक

अडथळे संपले भक्तीचा मार्ग सुकर, देवगड-देवतळे शिवरस्ता एका वर्षात पूर्ण; … प्रशासकीय गतिमानता आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे खंडोबा भक्तांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली

अनेक वर्षांपासून बंद असलेला हा रस्ता आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि महसूल विभागाच्या तत्परतेमुळे अवघ्या एका वर्षात वाहतुकीसाठी सज्ज झाला असून, आमदारांनी चंपाषष्ठीच्या निमित्ताने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2026Updated:17/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी:

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थान ते देवतळे येथील खंडोबा देवस्थान जोडणारा ऐतिहासिक शिवरस्ता अखेर खुला झाला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेला हा रस्ता आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि महसूल विभागाच्या तत्परतेमुळे अवघ्या एका वर्षात वाहतुकीसाठी सज्ज झाला असून, आमदारांनी चंपाषष्ठीच्या निमित्ताने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.

हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी आणि देवगाव या गावांमधून जाणारा हा शिवरस्ता बंद असल्याने खंडोबा भक्तांना दर्शनासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. गेल्या वर्षी चंपाषष्ठी उत्सवासाठी देवतळे येथे आले असता, रामभाऊ रहाणे, ज्ञानदेव रहाणे, किशोर रहाणे, संजय रहाणे आणि जालिंदर पावसे या भक्तांनी आमदार खताळ यांच्याकडे हा रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. त्यावर आमदारांनी एका वर्षात रस्ता खुला करून देऊ, असा शब्द दिला होता.

आमदार खताळ यांनी दिलेल्या सूचनेनुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. महसूल मंडळ अधिकारी आरती साठे आणि तलाठी मयुरी मुन्तोडे यांनी स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला. तहसीलदार मांजरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सामोपचाराने प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.

या रस्त्याच्या मार्गात देवगाव येथील संतोष बाबासाहेब कोटकर व लक्ष्मण बबन कोटकर यांची जमीन येत होती. रस्ता होणे किती गरजेचे आहे, हे प्रशासनाने पटवून दिल्यानंतर कोटकर बंधूंनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या शेतातून रस्ता नेण्यास संमती दिली. त्यांच्या या सहकार्यामुळेच या कामातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला.

महसूल विभागाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत अवघ्या एका दिवसात सुमारे २ ते २.५ किलोमीटर लांबीचा शिवरस्ता प्रत्यक्ष जमिनीवर तयार करून दिला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रस्ता खुला झाल्यामुळे आता देवगड आणि देवतळे या दोन तीर्थक्षेत्रांमधील अंतर कमी झाले असून, खंडोबा भक्तांनी आमदार अमोल खताळ आणि महसूल प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.

हा रस्ता खुला करण्यासाठी देवगावचे पोलीस पाटील अजय पावसे, माधव लामखडे, भास्कर शिंदे, सुनील शिंदे, संतोष शिंदे, रमेश वर्पे, काशिनाथ पावसे, सरपंच सुभाष गडाख, गणेश दवंगे आणि दशरथ पावशे यांनी विशेष परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 852
अमोल खताळ धीरज मांजरे शिवरस्ता
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.