Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाची ‘RGSS’ कडून थेट मैदानात उतरून तपासणी; मालपाणी इंडस्ट्रीज जवळ उड्डाणपुलावर संशयास्पद कामाची घेतली दखल
सामाजिक

पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाची ‘RGSS’ कडून थेट मैदानात उतरून तपासणी; मालपाणी इंडस्ट्रीज जवळ उड्डाणपुलावर संशयास्पद कामाची घेतली दखल

RGSS च्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी अभियंता शुक्ला यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत पुलावरील ४ ते ५ वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे घेऊन काँक्रिटच्या थराची जाडी मोजली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाच्या कामाबाबत ‘RGSS’ टीमने आक्रमक पवित्रा घेतला असून, थेट मैदानावर उतरून कामाची गुणवत्ता तपासली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिंदे यांनी तात्काळ आपल्या तज्ज्ञ टीमला पाचारण केले आणि प्रत्यक्ष घटनास्थळी तपासणीचे आदेश दिले.

मालपाणी ट्रक टर्मिनसपाशी असलेल्या उड्डाणपुलावर करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाच्या जाडीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, RGSS टीमने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाची सखोल चौकशी करत पाहणी केली.

नाशिक पुणे महामार्गावर मालपाणी इंडस्ट्रीज लगत असलेल्या उड्डाणपुलावर सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाची जाडी काही ठिकाणी ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा कमी असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. यासंदर्भात RGSS कडे तक्रारी प्राप्त होताच, सदस्यांनी तातडीने ऑथॉरिटी इंजिनिअर दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. 

RGSS च्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत शिंदे यांनी आपल्या टीमला तक्रारीच्या अनुषंगाने तपासणीचे आदेश दिले होते. या तपासणीदरम्यान पाठवलेली टीम आणि साईट इंजिनिअर शुक्ला हे प्रत्यक्ष उपस्थित होते. RGSS च्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी अभियंता शुक्ला यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत पुलावरील ४ ते ५ वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे घेऊन काँक्रिटच्या थराची जाडी मोजली. 

यावेळी कामातील पारदर्शकता तपासण्यासाठी तांत्रिक बाबींची बारकाईने पाहणी करण्यात आली. केवळ प्रत्यक्ष पाहणीवर न थांबता, RGSS कडून या कामाचे प्रयोगशाळेतील अधिकृत रिपोर्ट सादर करण्याची विनंतीही शुक्ला यांना करण्यात आली आहे.

देशाचे कार्यक्षम दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात महामार्गांचे जाळे विणले जात आहे. या विभागांतर्गत होणारी कामे उच्च दर्जाचीच असावीत, ही आमची ठाम भूमिका आहे. महाराष्ट्राला सक्षम, मजबूत आणि खड्डेमुक्त रस्ते मिळावेत, यासाठी RGSS सदैव जागरूक राहील, अशी भावना यावेळी टीमच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

पुणे-नाशिक हायवेच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर कामात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या तपासणीमुळे कंत्राटदार आणि संबंधित विभागामध्ये मोठी खळबळ उडाली असून, आता प्रयोगशाळेतील अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी आरजीएसएसचे समन्वयक सतीश खताळ, अमोल शेलकर, राम अरगडे, अरुण चव्हाण, मोहसीन शेख, प्रकाश कडलग, रवींद्र हासे, अरुण जाधव, संजय बागुल, सोमनाथ हासे, प्रवीण हासे आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,246
RGSS कामाची तपासणी नाशिक पुणे महामार्ग राहुल गांधी समर्थक संघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.