Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा: नगर परिषद ते कॅप्टन लक्ष्मी चौक रस्त्याला ‘धर्मवीर आप्पा केसेकर’ यांचे नाव मिळणार!
सामाजिक

संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा: नगर परिषद ते कॅप्टन लक्ष्मी चौक रस्त्याला ‘धर्मवीर आप्पा केसेकर’ यांचे नाव मिळणार!

यासंबंधीचा अधिकृत ठराव लवकरच संगमनेर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत (कौन्सिल) मंजूर केला जाणार असल्याची माहिती मुर्तडक यांनी दिली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/02/2026Updated:02/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 

शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व, शिवसेनेचे संगमनेर मधील पहिले नगरसेवक, स्वर्गीय धर्मवीर आप्पा केसेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ संगमनेर नगर परिषदेने एक मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. संगमनेर नगर परिषद कार्यालय ते कॅप्टन लक्ष्मी चौक या मुख्य रस्त्याला आता ‘स्वर्गीय धर्मवीर आप्पा केसेकर’ यांचे नाव दिले जाणार आहे.

कैलास (आप्पा) केसेकर यांच्या दशक्रिया विधीवेळी रविवारी श्रद्धांजली वाहताना सभेत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विश्वासराव मुर्तडक यांनी ही घोषणा केली. यावेळी बोलताना मुर्तडक भावूक झाले होते. केसेकर यांच्या निधनाने शहराने एक अभ्यासू आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेला नेता गमावल्याची भावना यावेळी उपस्थित जनसमुदायाने व्यक्त केली.

आप्पा केसेकर यांनी नगरसेवक म्हणून काम करताना प्रशासनावर असलेली पकड आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण, सभागृहात सामान्यांचे मांडलेले प्रश्न यामुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. संगमनेरच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. 

हा रस्ता शहराच्या मुख्य वर्दळीचा भाग असून, नगर परिषद आणि कॅप्टन लक्ष्मी चौक या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो. या रस्त्यावरच साळीवाडा भागात केसेकर यांचे निवासस्थान आहे. या रस्त्याला आप्पांचे नाव मिळाल्यास त्यांच्या कार्याची आठवण शहराच्या हृदयात कायमस्वरूपी कोरली जाईल. यासंबंधीचा अधिकृत ठराव लवकरच संगमनेर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत (कौन्सिल) मंजूर केला जाणार असल्याची माहिती मुर्तडक यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे शिवसेनेचे पहिले नगरसेवक व धर्मवीर म्हणून परिचित असलेले आप्पा केसेकर यांच्या स्मृती जतन होणार आहे. यामुळे केसेकर प्रेमी आणि संगमनेरकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, एका खऱ्या लोकप्रतिनिधीचा हा उचित सन्मान ठरेल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

📌 आप्पा केसेकर हे केवळ माझे सहकारी नव्हते, तर ते शहराच्या विकासाचे साक्षीदार होते. मी नगराध्यक्ष असताना त्यांनी नगरसेवक म्हणून दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या महत्त्वाच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव आम्ही नगर परिषदेच्या आगामी कौन्सिलमध्ये मांडणार आहोत.
— विश्वास मुर्तडक, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,075
आप्पा केसेकर आप्पा केसेकर मार्ग निर्णया विश्वास मुर्तडक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.