Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपघातात झरेकाठीची तरुण मुलगी गंभीर जखमी; कुटुंबाचे मदतीसाठी आवाहन
सामाजिक

अपघातात झरेकाठीची तरुण मुलगी गंभीर जखमी; कुटुंबाचे मदतीसाठी आवाहन

दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनी या कठीण काळात तिच्या आईच्या 9673774311 या फोन पे क्रमांकावर आर्थिक मदत करावी, असे कळकळीचे आवाहन आकांक्षाच्या पालकांनी केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

झरेकाठी वार्ताहर:

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील आकांक्षा रवींद्र निकम ही तरुणी अहिल्यानगर येथे कामानिमित्त जात असताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अपघातात तिला गंभीर दुखापत झाली असून सध्या तिच्यावर अहिल्यानगरमधील झोपडी कॅन्टीन परिसरातील मॅक्स सुपर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

आकांक्षा बोल्हेगाव फाटा येथील एमआयडीसीमध्ये कंपनीच्या कामासाठी जात असताना, एका भरधाव मोटरसायकलने आणि विटांनी भरलेल्या डंपरने तिला जोरदार धडक दिली. या अपघाताची भीषणता मोठी असून डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे, तर संबंधित मोटरसायकल चालक मदत करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी आकांक्षाचे वडील रवींद्र चांगदेव निकम यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी MH 16 DP 7941 क्रमांकाचा डंपर आणि MH 20 FK 682 क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे पाटील यांना दिली. नामदार विखे पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित पोलीस निरीक्षकांना दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

आकांक्षा हिच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हॉस्पिटलचे आतापर्यंतचे बिल दीड लाख रुपयांच्या घरात गेले असून, पुढील शस्त्रक्रियेसाठी आणखी दोन ते तीन लाख रुपयांची तातडीने गरज आहे. पैशांअभावी पुढील उपचार थांबण्याची भीती निर्माण झाली आहे.

आपल्या पोटच्या लेकीचे प्राण वाचवण्यासाठी निकम कुटुंबियांची मोठी ओढाताण होत असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनी या कठीण काळात तिच्या आईच्या 9673774311 या फोन पे क्रमांकावर आर्थिक मदत करावी, असे कळकळीचे आवाहन आकांक्षाच्या पालकांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,741
अपघात आर्थिक मदत मदत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.