Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, ग्राफिक डिझायनर असलेला मुख्य सूत्रधार जेरबंद
गुन्हेगारी

पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, ग्राफिक डिझायनर असलेला मुख्य सूत्रधार जेरबंद

पोलिस तपासादरम्यान हे जाळे अत्यंत खोलवर पसरल्याचे दिसून आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/02/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कारवाईमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून पोलीस आता या प्रकरणाच्या अधिक मुळाशी जात आहेत.
मालेगाव:
येथील छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा छडा लावण्यात मालेगाव परिमंडळ पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी थेट छत्रपती संभाजीनगर येथील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर याला बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईत पोलिसांनी पाचशे रुपयांच्या २०० बनावट नोटांसह नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण २ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाची सुरुवात २३ जानेवारी २०२६ रोजी झाली, जेव्हा सटाणा नाका येथील एचडीएफसी बँकेत एका फायनान्स कंपनीचे कलेक्शन एजंट गणेश खरे हे रक्कम भरण्यासाठी आले होते. त्यांच्या ८९ हजार रुपयांच्या भरण्यामध्ये ५० हजार रुपयांच्या (पाचशेच्या १०० नोटा) बनावट असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. बँकेचे असिस्टंट मॅनेजर मोहन मुसळे यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे फिरवली.
पोलिस तपासादरम्यान हे जाळे अत्यंत खोलवर पसरल्याचे दिसून आले. सुरवातीला अजय राठोड याला ताब्यात घेण्यात आले, त्याने ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी या नोटा दिल्या होत्या. त्यानंतर सखोल चौकशीतून करण राठोड, बन्सीलाल यादव, समीर शेख आणि गोल्डन कुरेशी अशी एकामागून एक नावे समोर येत गेली. या साखळीचा पाठलाग करत असताना पोलिसांना अजिंक्य जाधव आणि शुभम थोरात यांच्यामार्फत मुख्य सूत्रधार संतोष केळसकर याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले.
केळसकर हा व्यवसायाने ग्राफिक डिझायनर असून तोच या बनावट नोटांच्या निर्मितीचे काम पाहत होता. त्याच्याकडून एक लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि त्या तयार करण्यासाठी लागणारे १ लाख ३६ हजार रुपयांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून पोलीस आता या प्रकरणाच्या अधिक मुळाशी जात आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 765
कारवाई बनावट नोटा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.