Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली संगमनेर परिसरात ६.६५ कोटींचा गंडा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली संगमनेर परिसरात ६.६५ कोटींचा गंडा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी महेश विश्वास मोरे (रा. माळेगाव पठार, ता. संगमनेर), वैभव विठ्ठल काकड (रा. डोळासणे, ता. संगमनेर), राहुल शिंदे (रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर), विजय तबाजी काळे (रा. मालदाड रोड, संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी-
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते ११ टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील सुमारे ६० ते ६२ नागरिकांची ६ कोटी ६५ लाख ३९ हजार ८३७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी योगेश रामदास जऱ्हाड (रा. आश्वी बु।।, ता. संगमनेर) यांना त्यांचे मित्र राहुल शिंदे आणि ओळखीचे विजय काळे यांनी डिसेंबर २०२४ मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले होते. ‘अदमास डेप्ट कन्सल्टन्सी प्रा.लि.’ आणि ‘प्रथम वेल्थ मॅनेजमेंट’ या कंपन्यांच्या माध्यमातून चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
फिर्यादी जऱ्हाड यांनी वेळोवेळी आरटीजीएस आणि फोन-पे द्वारे एकूण १०,००,००० रुपये संशयित आरोपींच्या खात्यावर वर्ग केले होते. सुरुवातीचे दोन महिने त्यांना ११ टक्के दराने परतावा देण्यात आला, मात्र त्यानंतर परतावा देण्यास टाळाटाळ सुरू झाली. फिर्यादीने जेव्हा संगमनेरमधील घुलेवाडी येथील जिजामाता प्राईड इमारतीमधील कार्यालयात भेट दिली, तेव्हा ते कार्यालय बंद असल्याचे आढळून आले.
केवळ फिर्यादीच नव्हे तर संगमनेर तालुक्यातील इतर ६० ते ६२ नागरिकांनाही अशाच प्रकारे जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले होते. या सर्वांची मिळून एकूण ६ कोटी ६५ लाख ३९ हजार ८३७ रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी महेश विश्वास मोरे (रा. माळेगाव पठार, ता. संगमनेर), वैभव विठ्ठल काकड (रा. डोळासणे, ता. संगमनेर), राहुल शिंदे (रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर), विजय तबाजी काळे (रा. मालदाड रोड, संगमनेर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८ (४), ३१६ (२) आणि ३ (५) अन्वये दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन वाकडे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,190
गुन्हेगारी फसवणूक शेअर मार्केट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.