Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये शनिवारी महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर; एकविरा फाउंडेशन व एसएमबीटीचा पुढाकार
आरोग्य

संगमनेरमध्ये शनिवारी महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर; एकविरा फाउंडेशन व एसएमबीटीचा पुढाकार

खासगी रुग्णालयांमध्ये ज्या तपासण्यांसाठी १० हजार रुपयांहून अधिक खर्च येतो, त्या सर्व तपासण्या येथे पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/03/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी –
सध्या समाजामध्ये वाढत चाललेले कॅन्सरचे प्रमाण ही एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे. मात्र, प्राथमिक टप्प्यात निदान होऊन योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच सामाजिक बांधिलकीतून शनिवारी (दिनांक १४ मार्च) एकविरा फाउंडेशन, इंडियन कॅन्सर सोसायटी आणि एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व युवतींसाठी विशेष मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी ही माहिती दिली असून जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रिकेट, रस्सीखेच आणि बॅडमिंटन अशा खेळांमध्ये सुमारे ५२०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. महिलांच्या या वाढत्या प्रतिसादामुळे स्पर्धांचा कालावधी दोन दिवसांनी वाढवण्यात आला असून, खेळांसोबतच त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
हे भव्य शिबिर शनिवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत स्थानिक क्रीडा संकुलात ‘सतर्क अभियाना’ अंतर्गत पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि रक्ताचा कॅन्सर यांसह विविध प्रकारच्या कॅन्सरची तज्ज्ञांमार्फत मोफत तपासणी केली जाईल. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे, खासगी रुग्णालयांमध्ये ज्या तपासण्यांसाठी १० हजार रुपयांहून अधिक खर्च येतो, त्या सर्व तपासण्या येथे पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. तसेच, तपासणीदरम्यान एखादी महिला कॅन्सर पॉझिटिव्ह आढळल्यास, अल्केम फाउंडेशनच्या सहकार्याने तिची पुढील २५ हजार रुपयांपर्यंतची आरोग्य तपासणी देखील मोफत केली जाणार आहे.
या शिबिरात एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल, धामणगाव येथील कॅन्सर विभागातील नामांकित डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ आणि अनुभवी वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. तालुका व शहरातील ३० वर्षांवरील सर्व महिलांनी आणि गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकविरा फाउंडेशन, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 342
आरोग्य तपासणी शिबिर एकविरा फाउंडेशन एसएमबीटी जयश्री थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

25/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या…

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.