Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. शेवटी शेततळ्याकडे जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/03/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी- 
संगमनेर तालुक्यातील साकूर शिवारात एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी घडली आहे. पाराजी धोंडीबा देवगिरे असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण साकूर आणि देवगिरे वस्ती परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाराजी देवगिरे हे साकूर येथील देवगिरे वस्तीवर वास्तव्यास होते. त्यांची बोराटे वस्ती परिसरात शेती असून तिथे त्यांनी शेतीच्या पाण्यासाठी अलीकडेच नवीन शेततळे उभारले होते. रविवारी (१५ मार्च) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते शेतीच्या कामासाठी या शेततळ्यावर गेले होते.
मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. शेवटी शेततळ्याकडे जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यांना तातडीने साकूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गांधले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पाराजी देवगिरे हे संजय देवगिरे यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा मोठा परिवार आहे. घराचा आधारवड गेल्याने देवगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून साकूर परिसरात शोककळा पसरली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 820
घारगाव पोलीस शेततळ्यात बुडून मृत्यू साकुर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.