Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालकमंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने सौर ऊर्जेवरील ४७ हायमॅक्स मंजूर; नागरीकांसाठी पायाभूत सुविधांना महायुतीचे प्राधान्य- आमदार खताळ
राजकारण

पालकमंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने सौर ऊर्जेवरील ४७ हायमॅक्स मंजूर; नागरीकांसाठी पायाभूत सुविधांना महायुतीचे प्राधान्य- आमदार खताळ

अमोल खताळ यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
संगमनेर शहरातील प्रभागांकरीता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन व विकास समितीमधून सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून ४७ सौर ऊर्जेवरील हायमॅक्स दिवे मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी १४ हायमॅक्स दिव्यांचे काम पूर्ण झाले असून, या दिव्यांचे लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत जनतानगरमधील जिजामाता गार्डन आणि लालतारा हाउसिंग सोसायटी येथील हायमॅक्स दिव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यास मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमार्फत एकूण २०० सौर ऊर्जेवर चालणाऱ्या स्वयंचलित हायमॅक्स दिव्यांना मंजुरी मिळाली आहे. यातील १०० दिव्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. हे दिवे पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेवर वीज बिलाचा कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही.
हे दिवे दररोज संध्याकाळी सात वाजता आपोआप सुरू होतात, त्यामुळे महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला तरी नागरिकांना अखंड प्रकाश सुविधा मिळणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा दिलासा ठरत आहे.
लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम असून, शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. तसेच नमो गार्डनची कामेही मंजूर झाली असून, शहराच्या विकासासाठी महायुती सरकार भक्कमपणे उभे आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 628
अमोल खताळ लोकार्पण हायमॅक्स
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.