Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप
सामाजिक

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

आधुनिक कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांगांना दैनंदिन कामे करणे अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला एक नवी बळकटी मिळाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

दर्शन रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. ३० मे) पार पडलेल्या या शिबिरात ११४ दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ११८ कृत्रिम अवयवांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जयपूर फूट, कृत्रिम हात आणि अत्याधुनिक ‘LN-4’ प्रोस्थेटिक हातांचा समावेश होता. या आधुनिक कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांगांना दैनंदिन कामे करणे अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला एक नवी बळकटी मिळाली आहे.

रोटरी क्लब ऑफ संगमनेर, मुंबईचे रत्ननिधी फाऊंडेशन आणि रियांश मल्टिट्रेड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला लाभार्थी आणि संगमनेरकर नागरिकांचा प्रतिसाद लाभला. यावेळी नगरसेविका रचना मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे सहाय्यक प्रांतपाल रो. अमोल वैद्य, काजळे ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र काजळे, रत्ननिधी फाऊंडेशनचे मनोज चव्हाण आणि दर्शन रोटरी आय केअरच्या डॉ. तोडकडी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना रचना मालपाणी यांनी रोटरी क्लब आणि रत्ननिधी फाऊंडेशनच्या या कौतुकास्पद कार्याचा गौरव केला. आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भविष्यातही अशाच लोकहितवादी प्रकल्पांची अंमलबजावणी करून समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच उद्योजक राजेंद्र काजळे यांनीही या समाजोपयोगी प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे अध्यक्ष रो. विश्वनाथ मालानी, सचिव रो. सौरभ म्हाळस, उपाध्यक्ष रो. महेश वाकचौरे, प्रकल्प समन्वयक रो. अजित काकडे आणि प्रकल्प प्रमुख रो. आनंद हासे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रकरणी रो. महेश ढोले, रो. डॉ. प्रमोद राजुस्कर, रो. डॉ. सुजय कानवडे, रो. डॉ. किशोर पोखरकर, रो. राजेंद्र खोसे, रो. दिपक मणियार यांच्यासह अनेक रोटेरियन सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

दर्शन रोटरी आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापक अंकुश आहेर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि रत्ननिधी फाऊंडेशनच्या संपूर्ण टीमने या शिबिराचे नेटके नियोजन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 495
जयपुर फूट दिव्यांगांना साहित्य वाटप रोटरी क्लब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.