Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप
महाराष्ट्र संवाद विशेष

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

या संपूर्ण प्रकरणाची आता 'हिंदू जनजागृती समिती'ने गंभीर दखल घेतली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे:

पुण्यातील प्रमुख आयटी हब मानल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित आयटी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका ४८ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रचंड दबाव आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित महिला अधिकाऱ्याने पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत जाहीरपणे वाच्यता करत स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होती. याच कार्यालयात काम करणाऱ्या एका अन्य महिला कर्मचाऱ्याने तिच्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म बदलण्यासाठी वारंवार दबाव आणण्यास सुरुवात केली होती. मात्र, पीडित महिलेने या दबावाला बळी न पडता या सर्व मागण्यांना अत्यंत स्पष्ट शब्दांत नकार दिला. एवढेच नव्हे तर कंपनीतील एका अंतर्गत कार्यक्रमात तिने या गंभीर विषयावर जाहीरपणे भाष्यही केले होते.

हा नकार संबंधित व्यक्तींच्या जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी पीडित महिलेविरुद्ध सूडबुद्धीने वागण्यास सुरुवात केली. लग्न आणि धर्मपरिवर्तनाचा प्रस्ताव नाकारल्याचा सूड म्हणून कामाच्या ठिकाणी तिला जाणीवपूर्वक त्रास देणे सुरू झाले. कार्यालयातील वातावरण अत्यंत क्लेशदायक बनवून तिच्यावर सातत्याने मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. या छळाला कंटाळून अखेर त्या महिला अधिकाऱ्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, असा दावा पीडित महिलेने केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची आता ‘हिंदू जनजागृती समिती’ने गंभीर दखल घेतली आहे. समितीने या प्रकरणाला ‘कॉर्पोरेट जिहाद’ असे संबोधत या संपूर्ण प्रकाराची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे केली आहे. सुशिक्षित आणि अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आयटी क्षेत्रात अशा प्रकारचा अमानुष मानसिक छळ होत असल्याने सध्या पुणे शहर आणि आयटी वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 456
आयटी कंपनी कॉर्पोरेट जिहाद हिंजवडी पुणे हिंदू जनजागृती समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.