Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन
सामाजिक

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

शासनाने आणि प्रशासनाने या संवेदनशील बाबींची दखल घेतली नाही, तर स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
अहिल्यानगर शहरातून संगमनेर तालुक्यातील ‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीमधील बी-१ आणि बी-२ या गाळ्यांमध्ये एका वाईन शॉपचे स्थलांतर प्रस्तावित आहे. मात्र, या स्थलांतरामुळे परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि स्थानिक व्यवसायांवर विपरीत परिणाम होणार असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात स्थानिक व्यावसायिकांनी एकत्र येत आमदार अमोल खताळ यांना देखील विरोध दर्शविणारे निवेदन दिले आहे.
या निवेदनावर विनीत देवेंद्र मेहता, कल्पेश चिमनलाल मेहता, भीमाशंकर रावबा चकोर, सिद्धार्थ ओझा, हर्षवर्धन खुळे यांच्यासह प्रमुख व्यावसायिकांच्या सह्या आहेत. या हरकतीमध्ये स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. अहिल्यानगरहून संगमनेर तालुक्यात वाईन शॉप स्थलांतरित करताना संगमनेर नगर परिषदेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असतानाही, तशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने या संपूर्ण प्रक्रियेत प्रचंड गोपनीयता बाळगून शासकीय नियमांना हरताळ फासला असल्याचा दावा करण्यात आला आहे. नियमांनुसार आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ आणि इमारतीच्या सहकारी संस्थेची परवानगी यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या कायदेशीर बाबींना जाणूनबुजून डावलण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
संबंधित ‘टॉपटेन इम्पेरिअल’ ही एक व्यावसायिक इमारत असून, येथे ज्वेलर्स, रिलायन्स इलेक्ट्रॉनिक शॉप, फायनान्स व इन्शुरन्स कंपन्यांची कार्यालये, पतसंस्था, चार्टर्ड अकाउंटंट, डेंट क्लिनिक, ब्युटी पार्लर, कापडाचे दुकान आणि लहान मुलांसाठी गेम झोन यांसारखी अनेक नामांकित प्रतिष्ठाने कार्यरत आहेत. या व्यावसायिक वातावरणामुळे येथे दैनंदिन खरेदीसाठी महिला, लहान मुले आणि विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते. या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कर्मचारी काम करत असून, येथील वातावरण महिलांसाठी सुरक्षित आणि प्राधान्य देणारे आहे. अशा ठिकाणी वाईन शॉप सुरू झाल्यास तळीरामांचा वावर वाढेल, पार्किंगच्या जागेत मद्यपान करण्याचे प्रकार घडतील आणि रात्रीच्या वेळी छेडछाडीच्या घटना घडून महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय, धार्मिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातूनही या स्थलांतराला विरोध केला जात आहे. संबंधित व्यावसायिक कॉम्प्लेक्सच्या मागे अवघ्या ५० फूट अंतरावर भगवान मारुती देवाचे जुने मंदिर आहे. वाईन शॉपमुळे या मंदिराचे पावित्र्य भंग पावण्याची दाट शक्यता आहे. अशा संवेदनशील भागात मद्यविक्री केंद्र सुरू झाल्यास वाहतूक कोंडी आणि पार्किंगची मोठी समस्या निर्माण होईल. शिस्त नसलेल्या वाहनधारकांमुळे अपघातांचा धोका वाढेल आणि याचा थेट फटका येथील इतर व्यावसायिक व दुकानदारांना बसून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
इमारतीमधील सर्व व्यावसायिकांनी संयुक्तपणे निर्णय घेतलेला आहे की, या कॉम्प्लेक्समध्ये कोणत्याही स्वरूपाचा मांसविक्री किंवा दारू संबंधित व्यवसाय करू दिला जाणार नाही. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या बेकायदेशीर स्थलांतराची सखोल चौकशी करावी आणि या वाईन शॉपला दिलेली किंवा देण्यास प्रस्तावित असलेली परवानगी त्वरित रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर शासनाने आणि प्रशासनाने या संवेदनशील बाबींची दखल घेतली नाही, तर स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला असून, आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे प्रशासनच जबाबदार राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 878
टॉप टेन दारू दुकान विरोध
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.