Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
न्यायालय

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

न्यायालयीन कामात ॲड. उदयसिंह जे ढोमसे पाटील यांना ॲड. विजय उगले, ॲड. पंकज कडलग, ॲड. जयसेन गायकवाड, ॲड. समीर फटांगरे यांनी सहकार्य केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/07/2026Updated:22/07/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
दैवी शक्ती, मंतरलेले उपचार आणि असाध्य आजार बरे करण्याचा दावा करत गोरगरीब जनतेची आर्थिक, शारीरिक व मानसिक पिळवणुकीचा आरोप असलेल्या वडगावपान (ता. संगमनेर) येथील भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्या कुटुंबाला सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणात राजेंद्र गडगेची पत्नी अश्विनी राजेंद्र गडगे आणि मुलगा शिवम राजेंद्र गडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी मंजूर केला आहे.
नेमके प्रकरण काय?
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. राजेंद्र बापू गडगे याने ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅन्सर, ब्रेन ट्युमर, वंध्यत्व यांसारखे आजार देवाच्या नावाने आणि मंत्रशक्तीने बरे करण्याचे दावे केले होते. उपचाराच्या नावाखाली अवाढव्य दराने वनस्पती व पालापाचोळ्याची औषधे विकून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात होती. याशिवाय, कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा औषध साठवणुकीचा परवाना नसताना हा प्रकार सुरू होता.
पोलीस व अंनिसकडे तक्रार केल्याच्या रागातून आरोपींनी अ‍ॅड. रंजना गवांदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खंडणीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी एआय तंत्रज्ञान व बनावट व्हिडिओंचा वापर करून दत्तधाम आश्रमाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ व्हायरल केले होते.
पोलीस तपासात धक्कादायक खुलासे
सरकारी पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता एस. ए. वाकचौरे यांनी न्यायालयात बाजू मांडताना तपासातील गंभीर बाबी समोर आणल्या. तपासादरम्यान राजेंद्र गडगे आणि त्याच्या कुटुंबाच्या नावे विविध बँका व पतसंस्थांमध्ये सुमारे १.५ कोटी रुपये जमा असल्याचे आणि जवळपास ५ कोटी रुपयांची १३ पेक्षा जास्त स्थावर मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलीस पथकाने दत्तधाम आश्रमातील ३० निवासी खोल्यांची झडती घेऊन ९९ प्रकारचा औषधी साठा जप्त करत तो आश्रम सील केला आहे. घरामधून ३,३६,६६० रुपये रोख, व्हिडिओ रेकॉर्डिंगचे संगणक, कॅमेरे व लॅपटॉप जप्त करण्यात आले असून आश्रमातील पावती पुस्तके आणि कर्मचाऱ्यांचे पगार रजिस्टर सी.ए. मार्फत तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
बचाव पक्षाचा युक्तिवाद अन् न्यायालयाचा निर्णय
अर्जदारांच्या वतीने विधीज्ञ उदयसिंह ढोमसे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, २२ वर्षीय अर्जदार शिवम गडगे हा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी आहे आणि अश्विनी गडगे या गृहिणी आहेत. एफआयआरमध्ये अर्जदारांच्या विशिष्ट भूमिकेचा किंवा थेट कृत्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नसून, केवळ मुख्य आरोपीचे कुटुंबीय असल्याने त्यांना खोट्या आरोपांत अडकवण्यात आले आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेत स्पष्ट केले की, प्रथम माहिती अहवालात (FIR) अर्जदारांवर कोणतेही विशिष्ट गंभीर आरोप नाहीत आणि गुन्ह्यात थेट सहभाग सकृतदर्शनी दिसून येत नाही. मागील अडीच महिन्यांत तपास अधिकाऱ्यांना त्यांच्या अटकेची गरज भासली नव्हती; परंतु फिर्यादींच्या तक्रारींमुळे अर्जदारांना अटकेची भीती वाटत असल्याने त्यांना संरक्षण देणे न्यायोचित ठरेल असा निष्कर्ष काढला.
न्यायालयाने शिवम गडगे व अश्विनी गडगे यांना प्रत्येकी ४०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच फिर्यादी व साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव न आणणे, त्यांच्याशी संपर्क न साधणे आणि पोलीस तपासात किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड अथवा हस्तक्षेप न करण्याच्या कडक अटी न्यायालयाने घातल्या आहेत. न्यायालयीन कामात ॲड. उदयसिंह जे ढोमसे पाटील यांना ॲड. विजय उगले, ॲड. पंकज कडलग, ॲड. जयसेन गायकवाड, ॲड. समीर फटांगरे यांनी सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 647
अटकपूर्व जामीन गडगेबाबा जिल्हा व सत्र न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जर भारनियमन करण्याचे शासनाचे किंवा महावितरणचे अधिकृत परिपत्रक अथवा…

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.