Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरच्या पालकमंत्र्यांपाठोपाठ आता नाशिकच्या पालकमंत्र्यांचे धाडस; पिस्तूल घेऊन बंगल्यात घुसलेला चोरटा पकडला
सामाजिक

नगरच्या पालकमंत्र्यांपाठोपाठ आता नाशिकच्या पालकमंत्र्यांचे धाडस; पिस्तूल घेऊन बंगल्यात घुसलेला चोरटा पकडला

भुसे यांच्या सतर्कतेमुळे बंगल्यातील तीन महिलांचे प्राण वाचले; चोरट्याला चोप देत पोलिसांच्या केले स्वाधीन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2022Updated:24/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगरच्या पालकमंत्र्यांनी वाळू तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लोखंडी बोटी स्वतः पकडण्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, नाशिकच्या पालकमंत्र्यांचे नवे धाडस समोर आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी दरोड्याच्या उद्देशाने हातात पिस्तूल घेऊन बंगल्यात घुसलेल्या चोरट्याला पकडण्याचे धाडस दाखवले आहे. यामुळे बंगल्यातील तीन महिलांचे प्राण वाचले.

मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात घडलेल्या या घटनेची चर्चा राज्यभरात होत आहे. पालकमंत्री भुसे यांनी पकडलेल्या या संशयित चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

आज लक्ष्मीपूजन असल्याने बंगल्यात मोठ्या प्रमाणात रोकड, दाग दागिने असेल ते लुटून नेता येतील या उद्देशाने दुपारी साधारणता तीन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा बंगल्यात घुसला. यावेळी बंगल्यामध्ये तीन महिला होत्या. चोरट्याने त्याच्याकडील पिस्तुलाचा महिलांना धाक दाखवत दागिने आणि पैशाची मागणी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरून गेलेल्या महिलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.

या महिलांचा आवाज ऐकून काही नागरिक बंगल्याबाहेर गोळा झाले. नेमके याचवेळी पालकमंत्री दादा भुसे देखील याच भागात होते. त्यांनी देखील लगेच या बंगल्याकडे धाव घेत बंगल्याच्या आत असलेल्या चोरट्याला शरण येण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता. अखेरीस शरण आलेल्या छोट्याला नागरिकांनी चांगला चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी रविवारी नेवासे येथे वाळू उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लोखंडी बोटी पकडत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकाराची चर्चा सुरू असताना सोमवारी नाशिकच्या पालकमंत्र्यांनी दाखवलेल्या धाडसाची चर्चा सुरू झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 117
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.