Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे ‘आशा’ बनली गावातील पहिली महिला वकील
महाराष्ट्र संवाद विशेष

दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे ‘आशा’ बनली गावातील पहिली महिला वकील

तरुणींना मार्ग दाखविणाऱ्या आशाचे आता न्यायाधीशपदाचे स्वप्न
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/11/2022Updated:16/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

दुर्दम्‍य इच्‍छाशक्‍ती… अंगभूत असलेला कष्टाळूपणा अन्‌ ठरवले ते करणारच या ध्येयाने झपाटलेली एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी. ती आपले बीएचे शिक्षण इंग्लिश विषयातून पुर्ण करते… समोर असे निश्चीत ध्येय नव्हतेच… मात्र काहीतरी वेगळेच करण्याचे तिचे स्वप्न होते… गरिबीचे चटके सोसत काबाडकष्ट करत, प्रचंड अभ्यास करून हे स्वप्न तिने सत्यात उतरवलेच! … अन्‌ आशा पंढरीनाथ बागुल ही गावातील पहिली महिला वकील झाली. प्रत्‍येक तरुणीसाठी आदर्शदायी ठरावा असा आशाचा प्रवास थक्‍क करणारा आहे.

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील पंढरीनाथ बागुल यांच्या कुटूंबातही अनेक कुटूंबाप्रमाणेच गरीबी वाट्याला आलेली. मात्र या परिस्थितीत वडील आणि भावाच्या खांद्याला खांदा लावून तीदेखिल शेतीची मेहनतीची कामे करत असे. मात्र आपण या परिस्थितीला छेद देत वेगळे काहीतरी करु शकतो हा तिच्यात असलेल्या आत्मविश्वास तिला यशाच्या शिखरावर घेऊन गेला. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तीने गावातील पहिली वकील महिला बनण्याचा मान मिळवला. कर्तव्य, अभ्यास व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून केवळ वकील नाही तर कॉलेजमध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी होण्याचादेखील तिने मान मिळविला. त्यामुळे नुकताच पिंपरणे गावात न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांच्या हस्ते आशा हिचा नागरी सत्कार करण्यात आला.

पंढरीनाथ बागुल हे पत्नी शोभा, पाच मुली अन् एक मुलगा अशा कुटुंबासह राहतात. शेतीच्या माध्यमातून सगळ्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाची जबाबदारी़ भाऊ संजय याच्यावर आहे. आशा शाळेत असल्यापासूनच  शेतातील पीक कापणी, निंदणी या कामांमध्ये ती वडिलांना मदत करीत असे़. शालेय साहित्याची आबळ असताना जिल्हा परिषद, प. पु. गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ विद्यालयातील शिक्षणानंतर तिने संगमनेर महाविद्यालयात बी. ए (इंग्लिश) पूर्ण केल. त्यानंतर ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेजला वकीलीचे शिक्षण घेत पदवी मिळविली. सध्या ती संगमनेरच्या न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे. गावातील पहिली वकील महिला झाली यावरच समाधान न मानता सध्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन तिने न्यायाधीश पदाचे स्वप्न मनी बाळगले आहे.

बहिणीच्या शिक्षणासाठी भावाचा त्याग

वडील पंढरीनाथ, आई शोभा यांना वृद्धापकाळामुळे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे भाऊ संजय यानेच कुटूंबाची सर्व जबाबदारी आपल्यावर घेत सर्वांचे लग्न, शिक्षण पूर्ण केले. आशाच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी स्वतःचे शिक्षण बंद करून बहिणीच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं व तिचे वकील बनण्याचे स्वप्न पुर्णत्वास नेले.

संकटाला कणखरपणे सामोर जा!

शैक्षणिक कालावधीत आई, वडिल आणि भावाने घेतलेले कष्ट आयुष्यभर लक्षात ठेवेल. त्यावेळची नाजूक आर्थिक परिस्थिती कधीही विसरणार नाही. या परिस्थितीनेच ध्येयप्राप्तीसाठीची दुर्दम्य इच्छाशक्ती मला दिली. आता वकील म्हणून मी निराधार महिला, घटस्फोटीत महिला व सर्व सामान्यांना न्याय देऊन देशसेवा करणार आहे. पुढे न्यायाधीश होण्याची इच्छा आहे.

अॅड. आशा बागुल

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 145
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.