Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रबोधनकारांचा ठाकरी बाणा माझ्यासह पुढच्या पिढीमध्ये : राज ठाकरे
सामाजिक

प्रबोधनकारांचा ठाकरी बाणा माझ्यासह पुढच्या पिढीमध्ये : राज ठाकरे

बदलत्या तंत्रज्ञानानुसार निर्मिती असलेल्या 'प्रबोधनकार डॉट कॉम' संकेतस्थळाचे आज लोकार्पण
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

प्रबोधनकार म्हणजेच केशव सिताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. प्रबोधनकारांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे नातू म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. याशिवाय आज ‘प्रबोधनकार डॉट कॉम’या संकेतस्थळाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे.

प्रबोधनकारांच्या संकेतस्थळाचे निमित्ताने हे दोन्ही नेते आज एकाच व्यासपीठावर येत आहेत. सायंकाळी साडेसात वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात संकेतस्थळाचा लोकार्पण कार्यक्रम होत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रबोधनकार पोहोचवावे या उद्देशाने ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

दरम्यान, १७ सप्टेंबर २०१० रोजी प्रबोधनकारांच्या १२५ व्या जन्मदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘पद्मश्री’ नामदेव ढसाळ यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले होते. आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार प्रबोधन प्रकाशनचे हे संकेतस्थळ नव्या स्वरूपात आणले जात असून त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.

प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील बिनीचे शिलेदार, समाजसुधारक, पत्रकार, फर्डे वक्ते म्हणून ओळखले जाते. एकीकडे प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे लोकार्पण होत असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावरील आपल्या या पोस्टमध्ये ‘त्यांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, जो माझ्यासह पुढच्या पिढीत आलाय’, असं लिहिले आहे.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले या पोस्टमध्ये...

“आज आमच्या आजोबांची – प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी आजोबांनी रुजवलेला हा ठाकरी बाणा कायम कटाक्षाने अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की”, आजोबांच्या स्मृतीस अभिवादन. असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

#प्रबोधनकारठाकरे pic.twitter.com/OpNMgwPSxm

— Raj Thackeray (@RajThackeray) November 20, 2022

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 181
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.