Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कुक्कुटपालन व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन!
सामाजिक

कुक्कुटपालन व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन!

पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांची माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/11/2022Updated:22/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

राज्यात खासगीरित्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी राज्यात प्रथमच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

या समितीच्या स्थापनेचा शासन आदेश निर्गमित झाला असून, 11 सदस्यांच्या समितीची संरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पशुसंवर्धन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत होणाऱ्या या समितीत पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, सहायक आयुक्त, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक, कंत्राटी पद्धतीने मांसल कुक्कूट व्यवसाय करणारे तीन शेतकरी, ओपन पद्धतीने मांस कुक्कूट व्यवसाय करणारे शेतकरी, कुक्कूट अंडी उत्पादन करणारे पाच शेतकरी, कुक्कूट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे पाच प्रतिनिधी, राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे प्रतिनिधी यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त हे सदस्य सचिव म्हणून काम पाहाणार आहेत.

राज्यातील कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कंपन्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे 3 नोव्हेंबर 2022 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये राज्याच्या विविध भागातून करार पद्धतीने मांसल कुक्कूट पालन तसेच अंडी उत्पादन करणारे शेतकरी व व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या अडचणीबाबत लक्ष वेधले होते. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे प्रतिनिधीत्व देवून शेतकरी व कंपन्यांच्या प्रतिनिधीचा समावेश असलेली राज्यस्तरीय कुक्कूट समन्वय समितीची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.

राज्यात प्रथमच अशा पद्धतीची समिती स्थापन झाली असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, या समितीची दर तीन महिन्याला नियमितपणे बैठक आयोजित करुन त्याचे इतिवृत्त शासनास सादर होईल, यातून कुक्कुटपालन व्यवसाय करणारे शेतकरी, कंपन्यांना येत असलेल्या अडीअडचणीबाबत चर्चा होईल. परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे खासगी कुक्कुटपालन करणारे शेतकरी करार पद्धतीने कुक्कुटपालक कंपन्यांसोबत करार करुन व्यवसाय करतात.

परंतू मुळ दर करार, ग्रोईंग चार्ज, लिफ्टींग चार्ज, मजूरी बाजारभावाप्रमाणे परतावा न देणे याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकरण समन्वयातून करण्याबाबत समिती काम करेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

याबरोबरच शेतकरी व कंपन्यांमध्ये करारनाम्याच्या अनुषंगाने एक सर्वसमावेशक मसुदा तयार करण्यासाठीसुद्धा ही समिती काम करण्यास प्राधान्य देईल. शासनाच्या विविध विभागांची संबंधित बाबींबाबत आवश्यक त्या शिफारशी करणे, तसेच कुक्कुट व्यवसायात वेळोवेळी उद्भवणाऱ्या प्रासंगिक समस्येवर चर्चा करुन उपाययोजना सुचविण्यासाठी ही राज्यस्तरीय समिती काम करणार असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 103
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.