महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक बुधवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर त्यांच्या समवेत उपस्थित होते. 
मुख्यमंत्र्यांच्या साई दर्शनावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक शिर्डीमध्ये खास हेलिकॉप्टरने साई बाबांच्या दर्शनासाठी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर दुपारी आगमन झाल्यानंतर महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . 
दरम्यान बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने संगमनेर तालुकाध्यक्ष रमेश काळे यांनी देखील यावेळी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

