Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर दुर्दैवी वृत्त आलेच…ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड
महाराष्ट्र संवाद विशेष

अखेर दुर्दैवी वृत्त आलेच…ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड

गेल्या काही दिवसांपासूनची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अखेर संपली; शनिवारी घेतली एक्झिट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

मराठी नाटक, चित्रपटांसह हिंदी सिनेसृष्टीने आज एक ख्यातनाम अभिनेता गमावला आहे! पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या विक्रम गोखले यांचे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मराठी हिंदी चित्रपट सृष्टीवर अनेक दशक त्यांनी आपल्या अभिनयामुळे गाजवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार जाणवत होते. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे चाहते बाळगून होते. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीमध्ये आश्वासक सुधारणा दिसून आल्या. ते डोळे उघडत होते, हात पाय हलवत होते. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघेल, त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगीकर यांनी दिली होती.

त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. ते उपचारांना प्रतिसाद देत असतानाच आज दुपारी त्यांचे निधन झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ (1999) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांच्या भूमिकेत त्यांनी प्रभावी कामगिरी केली. विक्रम गोखले यांनी ‘हे राम’, ‘तुम बिन’, ‘भूल भुलैया’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगलम’ यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘निकम्मा’ (2022) होता, ज्यात अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया आणि शिल्पा शेट्टी सह-अभिनेत्री होते.

विक्रम गोखले पुण्यात एक अभिनय अकादमी चालवत होते, जिथे ते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पत्नीसह राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली गोखले व दोन मुली असा परिवार आहे. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा होता. त्यांची आजी अभिनेत्री होती, तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपट आणि रंगमंच कलाकार होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 110
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.