महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फौडेशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी संगमनेरमधील वैशाली डावखरे, जिल्हा उपाध्यक्षपदी कल्पना काळे यांची व मंजू माचरेकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष कौसर हुसेन शेख यांनी या पदाधिकाऱ्यांच्या नांवाच्या घोषणा केली.
संगमनेरमध्ये नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फौडेशनच्या माध्यमातून हजारो नागरिकांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले जाते. अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहात संघटनेची आढावा बैठक झाली. श्रीमती भारती मनसावले यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय हक्कासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहण्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
बैठकीसाठी संघटनेचे रमेश शिंदे, मझहर खान, अर्जून पाडेकर, नरेंद्र सोनी, वजीर शेख, संगमनेरमधील पदाधिकारी मन्सुर शेख, सरला सुर्यवंशी, अल्लाबक्ष शेख, एजाज खान, रवींद्र भराडे, सुवर्णा रोकडे आदींसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

