Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

19/10/2026

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून तरुणाची निर्दोष मुक्तता
न्यायालय

बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून तरुणाची निर्दोष मुक्तता

संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामधील आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

परीक्षेसाठी प्रवेश पत्र काढण्याकरिता अकोले येथील सायबर कॅफेमध्ये गेलेल्या बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गावातीलच तरुणाकडून अनैसर्गिक वर्तन केल्याच्या कारणावरून आरोपी विरोधात अकोले पोलीस ठाण्यात बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चार वर्षांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. काळे यांनी करत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर या घटनेची सुनावणी सुरू होती. खटल्या दरम्यान आरोपी जामिनावर मुक्त होता.

दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी विरोधात बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये आरोपीवर दोषारोप निश्चित करून या घटनेची सुनावणी न्यायालयात सुरू होती. सुनावणी दरम्यान आरोपीने आपल्यावरील दोषारोप नाकारले. अशा प्रकारचे कोणतेही कृत्य केले नसल्याचे व खोटेपणाने त्याला या प्रकरणात दबाव आणण्याच्या उद्देशाने गोवण्यात आले असल्याचा बचाव आरोपीच्या वतीने न्यायालयासमोर करण्यात आला. तसेच फिर्यादीच्या मावस बहिणीने आरोपीच्या सख्ख्या भावाशी प्रेमविवाह केला आहे. यासाठी मुलीच्या कुटुंबातून विरोध होता. त्यावरून दोन्ही कुटुंबात वादविवाद झाले. मुलीच्या कुटुंबाकडून पैशाची मागणी करण्यात आली. अशावेळी आरोपी हा घरातील कर्ता असल्याने त्याला खोट्या प्रकरणात गुंतवून त्याच्यावर दबाव आणण्यासाठी खोटी केस केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

याप्रकरणी न्यायालयासमोर फिर्यादी, फिर्यादीचे वडील आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीने वाईट उद्देशाने फिर्यादीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आला नाही. त्यामूळे समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी आरोपीची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड. नईम इनामदार यांनी काम बघितले. त्यांना ॲड. झेड. एच. तांबोळी, ॲड. एम. एन. इनामदार, ॲड. ए. एस. सय्यद यांनी सहाय्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 153
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

बंधाऱ्यावरून तरुणाची पाण्यात उडी; दुचाकी अन् मोबाईलमुळे उघडकीस आली थरारक घटना

By Annant Ppangarkar19/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३५) या तरुणाने…

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.