Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घरात घुसलेल्या बिबट्याचा वृद्धावर हल्ला; उपचारासाठी नाशिकला हलविले
महाराष्ट्र संवाद विशेष

घरात घुसलेल्या बिबट्याचा वृद्धावर हल्ला; उपचारासाठी नाशिकला हलविले

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/12/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पहाटेच्या सुमारास घरात घुसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ८० वर्षीय वयोवृद्ध गंभीर जखमी झाला. उपचारासाठी या वयोवृद्ध व्यक्तीला नाशिकला हलविण्यात आले आहे. अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील तिटमे वस्ती शिवारात ही घटना घडली.

निवृत्ती सयाजी उघडे असे या वृद्धाचे नाव असून त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या उजव्या कांद्याजवळ दंडाला बिबट्याने चावा घेतला. गुरुवारी रात्री निवृत्ती उघडे हे नेहमीप्रमाणे आपल्या घरातील उंबरठ्यावर झोपलेले होते. त्यांच्या घराला दरवाजा नाही. घरालगत बकऱ्या आणि शेळ्या बांधण्यात आलेल्या होत्या. त्या बंदिस्त होत्या. त्यांच्या घरालगत ऊसाचे शेत आहे.

शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास या शेतातून आलेला बिबट्या थेट उघडे यांच्या घरात घुसला. उंबरठ्यात झोपलेल्या उघडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. उघडे यांच्या ओरडण्याने घरातील इतर लोक जागे झाले. त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या ऊसाच्या शेतात पसार झाला.

शुक्रवारी सकाळी घटनास्थळी आलेल्या राजुर वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. वनकर्मचारी, गावकरी आणि उघडे कुटुंबीयांच्या मदतीने जखमी अवस्थेतील उघडे यांना अकोले येथील ग्रामीण रुग्णाल यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांचे प्रकृती आणि वयोमान लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 118
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.