Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारच्या भांडवलदार धार्जिण्या धोरणामुळे कामगारांनी संघर्षाची तयारी ठेवावी : कॉ. डॉ. भालचंद्र कांगो
सामाजिक

सरकारच्या भांडवलदार धार्जिण्या धोरणामुळे कामगारांनी संघर्षाची तयारी ठेवावी : कॉ. डॉ. भालचंद्र कांगो

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे कामगार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/12/2022Updated:16/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सार्वजनिक उद्योग विक्रीस काढले आहे. कामगार विरोधी धोरण राबवत असताना सरकारच्या भांडवलदारधार्जिने धोरणामुळे कामगारांनी यापुढील काळात संघर्ष आणि त्यागाची तयारी ठेवली पाहिजेत, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.

संगमनेर तालुका तंबाखू कामगार युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे कामगार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर १० व ११ डिसेंबरला पार पडले. कांगो यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कामगार व शेतकरी यांचे प्रतिक असलेल्या लाल झेंड्याचे ध्वजारोहण करत मानवंदना देण्यात आली. तसेच कॉ. सहाणे मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर युनियनचे अध्यक्ष कॉ. माधव नेहे, सरचिटणीस कॉ. ॲड. ज्ञानदेव सहाणे, डॉ. राधेश्याम गुंजाळ, पक्षाचे तालुका सचीव कॉ. प्रताप सहाणे, विडी कामगार नेते कॉ. कारभारी उगले, कॉ. शांताराम वाळुंज, तंबाखु युनियनचे पदाधिकारी, कामगार सोसायटीचे अध्यक्ष पाथर्डी येथील तंबाखु उद्योगातील कामगार कार्यकर्ते, फॉरेस्ट वाहतूकदार संघटनेचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

यावेळी काॅ. युगल रायलु, काॅं. राम बाहेती, राज्य महिला फेडरेशन अध्यक्षा काॅं. स्मिता पानसरे, काॅं. सुभाष लांडे, भाकप जिल्हा सचिव काॅं. बन्सी सातपुते यांनी दोन दिवसीय सत्रात कामगार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

कांगो म्हणाले, केवळ आपल्या आर्थिक प्रश्नांपुरते बघण्याची भूमिका सोडून द्यावे लागेल. संघटनेचे सभासद झाले म्हणजे आपले काम झाले ही वृत्ती बदलावी लागेल. कायम कामगार व कंत्राटी कामगार यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे.

कॉ. युगल रायलु यांनी संघटनात्मक दृष्टिकोनातून ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर विचार मंथन करत कामगार संघटना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. डॉ. राम बाहेती यांनी कामगार कायदा संदर्भात भाजप सरकारच्या धोरणाविषयी माहिती दिली.

स्मिता पानसरे यांनी औद्योगिक क्षेत्रात आणि समाज जीवनात महिलांचे स्थान दुय्यम असल्याचे सांगत समानतेवर भाष्य केले.

प्रास्ताविक कॉ. माधव नेहे यांनी, उपस्थितांचे स्वागत ॲड. ज्ञानदेव सहाणे यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 134
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग…

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.