महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पठाण चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. चित्रपटावर सर्वत्र टीका जरी होत असली तरी या चित्रपटाचे ओटीटी हक्क खूपच मोठ्या म्हणजेच तब्बल दोनशे कोटी किमतीला विकले गेले आहेत.
वादाच्या भोवऱ्यात अडकूनही एवढ्या मोठ्या किमतीला ‘पठाण’चे ओटीटी अधिकार विकले गेल्याने अनेक जण थक्क झाले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट यामुळे पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट नव्या वर्षात २५ जानेवारी रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील गाण्यामुळे वादात अडकला.
त्यामुळे बायकॉट पठाणचे नारे सुरू असताना त्याचे ओटीपी हक्क मात्र मोठ्या किमतीत विकले गेले आहेत. प्रदर्शनापूर्वीच्या चित्रपटाने २०० कोटीची कमाई केली असल्याचे सांगितले जाते.
चित्रपट वादात अडकल्यानंतर कोणता ओटीटी प्लॅटफॉर्म पठाण चित्रपट खरेदी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. एका मीडिया रिपोर्टनुसार, जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रदर्शनानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच मार्च महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस निर्माते विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सशी या चित्रपटाच्या हक्कांसंदर्भात बोलणे करत होते. पण यात बाजी मारली आहे ती ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने. त्यांनी २०० कोटी रुपयांना चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहे. पण अद्याप या गोष्टीची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही.

