महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : संगमनेर येथील देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले यांची उपाध्यक्षपदी अक्षय भागवत यांची, श्री चौंडेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी दिपाली खोजे, उपाध्यक्षपदी संगीता भंडारे यांची निवड करण्यात आली.
संगमनेर येथील मेनरोडवर असलेल्या देवांग कोष्टी समाजाचे चौंडेश्वरी देवीचे मंदिरामध्ये कोष्टी समाजाची युवक समितीची नूतन कार्यकारिणी निवडीसाठी नुकतीच बैठक पार पडली. यावेळी देवांग कोष्टी समाज पदाधिकारी यांनी युवक व महिला यांची एक समिती नेमण्यात यावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनतर ही समिती नेमण्यात आली आहे. 
यामध्ये देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले, उपाध्यक्षपदी अक्षय भागवत, कार्याध्यक्षपदी आलेख कुदळ, खजिनदारपदी स्वप्नील खोजे, सचिवपदी अजित बडदे, सहसचिवपदी सोमनाथ दिंडे, संघटकपदी शुभम गोडसे यांची निवड करण्यात आली. 
तर श्री चौंडेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी दिपाली खोजे, उपाध्यक्षपदी संगीता भंडारे, कार्याध्यक्षपदी पुष्पा गोडसे, सचिवपदी साधना मेहेत्रे, खजिनदारपदी शोभा काळंगे यांची निवड झाली आहे.
या निवडीवेळी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष संतोष ढोले, उपाध्यक्ष ज्योत्स्ना खोजे, खजिनदार राजेंद्र खोसे, सेक्रेटरी सतिष खोजे, सहसचिव सुनिल बाप्ते, कार्यालय प्रमुख जयश्री शेंडे, जनसंपर्क सुनील मानवतकर, विश्वस्त राम बाप्ते, अनिल ढोले, गोकुळ बाप्ते, दिपाली वाव्हळ, सागर गोडसे, धनंजय टिपरे, भारत ढोले, विनायक ढोले, संध्या ढोले, आकाश ढोले, मयूर ढोले आदीसह देवांग कोष्टी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व समाज बांधव उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवा नेते सत्यजित तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.

