Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर विरोधानंतर मालपाणी लॉन्सवरील तो कार्यक्रम रद्द
महाराष्ट्र संवाद विशेष

अखेर विरोधानंतर मालपाणी लॉन्सवरील तो कार्यक्रम रद्द

३१ डिसेंबरला होणार होता कार्यक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/12/2022Updated:30/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री लेजंड एंटरटेनमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आल्यानंतर तो रद्द करण्याची आफत संयोजकांवर ओढवली आहे.

नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या मालपाणी लॉन्स येथे लेजंड एंटरटेनमेंट या ग्रुपने नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या युवक-युवतींना इंस्टाग्रामवरील स्टारचे आकर्षण दाखवून व युवकांना २०० रुपये फी आकारून महिला-युवतींना विनामूल्य प्रवेश देत या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. मात्र या कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या संबंधित विभागाकडून घेतल्या नसल्याचा तसेच सदर कार्यक्रमाची तिकीट विक्री महाविद्यालयात जाऊन युवक-युवतींना पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण दाखवून केली जात असल्याचा आक्षेप घेत या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने एका निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक व तहसीलदारांकडे करण्यात आली होती.

पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत असताना मूळ आर्य व भारतीय संस्कृती मूल्यांचे अपपालन सदर इव्हेंट करताना करता येणार नाही. शासकीय रिपोर्ट पाहता भारतातील मोठ्या महानगरांमध्ये तसेच मुंबई, पुणे, नाशिक येथील रेव्ह पार्टी व इव्हेंट पार्ट्यांवर झालेल्या धाडीनंतर वेगवेगळे अंमली पदार्थ तस्करी करणारे लोक पडद्यामागून अशा इव्हेंटचे आयोजन करत असतात. असे निष्पन्न होत आहे सदर इव्हेंटचे त्या दृष्टीनेदेखील सखोल चौकशी करण्याची मागणी हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आली होती.

 

कार्यक्रम रद्द करत असल्याचे संयोजकांचे पत्र

सदर कार्यक्रमास सकल हिंदू समाज व राष्ट्रप्रेमी समाजसेवी संघटनांचा होणारा तीव्र विरोध पाहता संगमनेर शहराचे वातावरण खराब होऊ द्यायचे नसल्याने मालपाणी लॉन्स येथे होणारा लाईव्ह म्युझिक कोन्सर्ट हा कार्यक्रम रद्द करत असल्याचे लेजंट इंटरटेनमेंट म्युझिक अँड फिल्म प्रॉडक्शनच्यावतीने लेखी पत्र संगमनेर शहर पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 134
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.