Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शब्दगंध साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; संगमनेरमधील लेखक हिरालाल पगडाल यांचा पुरस्कारार्थीमध्ये समावेश
सामाजिक

शब्दगंध साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; संगमनेरमधील लेखक हिरालाल पगडाल यांचा पुरस्कारार्थीमध्ये समावेश

इलेक्शन बिलेक्शन, जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता, धगधगते तळघळ, रानजुई, नवरत्न, वळण वाटा या पुस्तकांना मिळाले पुरस्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दिले जाणारे २०२१ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारार्थीमध्ये संगमनेरमधील लेखक हिरालाल पगडाल यांच्या इलेक्शन बिलेक्शन या पुस्तकाचा देखील समावेश आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात संगमनेरचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.

इलेक्शन बिलेक्शन, जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता, धगधगते तळघळ, रानजुई, नवरत्न, वळण वाटा या पुस्तकांचा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारात समावेश आहे. पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची घोषणा शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केली.

पुरोगामी विचारांच्या आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेल्या शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने लेखक, कवी यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले जात असते. कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, चर्चासत्र, कथा-काव्य लेखन, विविध पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, बाल संस्कार शिबिर आदींचा यात समावेश असतो. याशिवाय वर्षातून एकदा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.

शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये सुनील गोसावी यांनी पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कार निवड समितीमध्ये कवयित्री शर्मिला गोसावी, सुभाष सोनवणे, प्रा. डॉ. अशोक कानडे, राजेंद्र फड, बबनराव गिरी, अजयकुमार पवार, किशोर डोंगरे, भारत गाडेकर यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.

असे आहेत २०२१ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार

‘इलेक्शन बिलेक्शन’ हिरालाल पगडाल, संगमनेर (संकीर्ण), ‘जगण विकणाऱ्या माणसांच्या कविता’ हबीब भंडारे, औरंगाबाद, ‘धगधगते तळघर’ उषा हिंगोणेकर जळगाव, ‘रानजुई’ डॉ. बी. जी. शेखर पाटील, ‘वळण वाटा’ प्रा. विश्वनाथ जाधव, आटपाडी, ‘नव रत्न’ उत्तम बोडखे, आष्टी, ‘दलित कवितेची निर्मिती प्रक्रिया’ डॉ. कैलास वानखडे, अकोले, ‘मित्रांची गोष्ट’ किरण भावसार, नाशिक, ‘किलबिल’ भारती सावंत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 235
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.