Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यात विविध विकास कामांसाठी ६.८० कोटीचा निधी
सामाजिक

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यात विविध विकास कामांसाठी ६.८० कोटीचा निधी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात मागील वर्षी अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या विविध रस्ते यांसह विविध विकास कामांच्या केलेल्या मागणीतून व पाठपुराव्यातून जिल्हा विकास नियोजनमधून या कामांना ६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तत्कालीन सरकारमध्ये मंत्री असलेल्या थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून घेत ही कामे रात्रंदिवस सुरू ठेवली होती. याचबरोबर तालुक्यातील रस्ते, अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या व विविध विकास कामांसाठी देखील मोठ्या निधीची मागणी केली होती. मात्र सत्ता बदल झाला आणि अनेक विकास कामांना स्थगिती मिळाली.

स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या विविध विकास कामांना जिल्हा नियोजन समितीने नुकतीच मंजुरी दिली असून या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ, वेल्हाळे, पिंपळगाव माथा, निळवंडे येथे अंगणवाडी खोल्या उभारण्यात येणार आहेत. या खोल्यांसाठी ४५ लाख रुपये, जनसुविधा योजनेअंतर्गत पेविंग ब्लॉक बसवणे, दशक्रिया विधी घाटाचे सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवणे, सोलर लॅम्प बसवणे व इतर सुशोभीकरण कामासाठी ५६ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या जांभुळवाडी,तळेगाव, शेळकेवाडी, कसबावाडी, पोखरी हवेली, साकुर आणि राजापूर येथे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. याच बरोबर नागरी सुविधांमधून चंदनापुरी येथील साईबाबा मंदिर परिसर स्वच्छतागृह अनुग्रह बांधण्यासाठी १२ लाख रुपये व साकुर येथील सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती करण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. याचबरोबर क वर्ग तीर्थक्षेत्रांकरता १ कोटी ५ लाख रुपये आणि संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण कामांसाठी ३ कोटी १० लाख रुपयांचा निधी असे एकूण ६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

याचबरोबर जनसुविधा योजनेअंतर्गत मेंगाळवाडी, निमगाव खुर्द, सावरगाव तळ, निमोन, निळवंडे, चिंचोली गुरव, आंबी खालसा, सावरगाव घुले, पोखरी बाळेश्वर, जवळे बाळेश्वर, वडगाव लांडगा, चिकणी, गुंजाळवाडी, वेल्हाळे, कासारा दुमाला, डोळासने, खंडेरायवाडी या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे. विविध गावांमध्ये होणाऱ्या या विकास कामांच्या निधी करता आमदार थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरणासह विविध कामांचा समावेश असलेली ही कामे लवकरात लवकर सुरू होणार असल्याची माहिती इंद्रजीत थोरात यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 166
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.