Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर बसस्थानक विकासक आर. एम. कातोरे यांना सुमारे साडेतीन कोटींचा दंड!
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर बसस्थानक विकासक आर. एम. कातोरे यांना सुमारे साडेतीन कोटींचा दंड!

अवैधरित्या गौण खनिजाचा वापर केल्याचे सिद्ध; अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : राज्यात बहुचर्चित ठरलेला संगमनेरच्या बस स्थानकाचे व व्यापारी संकुलाचे बांधकाम अवैध गौण खनिजाचा वापर करून करण्यात आल्याचे समोर आले आहे. वाळू मुरूम डबर याचा शासनाचा मोबदला बुडून वापर केल्याप्रकरणी विकसक आर एम कातोरे यांना संगमनेरच्या तहसीलदारांनी ३ कोटी ६६ लाख २२ हजार ८६९ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला.

यासंदर्भात अमोल खताळ पाटील यांनी दिलेली माहिती अशी, संगमनेर बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे बांधकाम बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर करण्यात आले आहे. हे बांधकाम करताना विकसक आर.एम.कातोरे यांनी गौण खनिज (वाळू, मुरूम, डबर) विशेषत: वाळूचा कुठलाही लिलाव संगमनेर येथे झालेला नसताना या कामासाठी मोठ्या प्रमाणात प्रवरा, मुळा नदीपात्रातून वाळू तस्करी करून हे बांधकाम केले आहे. तालुक्यात त्या कालावधीत कोणताही वाळूचा लिलाव झालेला नसतानाही वापरलेली वाळू पूर्णपणे अवैध, वाळू तस्करांकडून अथवा विकासकाने स्वत: नदी पात्रातून विनापरवानगी घेऊन वापरलेली आहे. तसेच बेकायदेशीरपणे उत्खनन करून दगड, मुरूम वापरलेले आहे अशी तक्रार २०१८ मध्ये संगमनेरच्या तहसीलदारांकडे केली होती.

तत्कालीन महसूलमंत्री यांच्या दबावापोटी तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात होते. तसेच विकसक कातोरे स्थानिक कॉंग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याचा खताळ यांचा आरोप होता. त्यामुळे खताळ यांनी वेळोवेळी पाठपुरावा करीत स्मरणपत्र देऊन हे प्रकरण अखेर तडीस नेले.

माहिती अधिकारामध्ये मिळविलेल्या सर्व कागदपत्रामध्ये बसस्थानक विकसक कातोरे यांनी गौण खनिजाबाबत कुठलीच परवानगी घेतलेली नाही, असे उत्तर तहसील कार्यालयाकडून मिळालेले होते. विकसकाने महसूल विभागाच्या तोंडी सूचनेनुसार रॉयल्टी भरली आहे, असे मोघम लेखी पत्र दिले होते. विकसक बांधा वापरा व हस्तांतरित करा या कामाबाबत महसूल विभागाची दिशाभूल करून कुठलाही खाणपट्टा आरक्षित नसताना मोघम चलनाद्वारे ३० किवा ३१ मार्चला भरणा दाखवत दाखविला आहे तो पूर्णत: गौण खनिज अधिनियम तरतुदीच्या विरोधी असून त्याबाबत कुठल्या खाण पट्ट्यातून याचा उल्लेख नाही.

चलन बाबत परवानगी पत्र, वाहन क्रमांक, पंचनामा रॉयल्टी, कार्यालयाकडे मागणी केलेले पत्र, ठेकेदाराने आरक्षित केलेला खान पट्टा दगड, मुरूम, वाळू याबाबत गौण खनिज परवाना नोंदवही तपासली असता त्यामध्ये कोणताही परवाना दिल्याचे आढळून आलेले नाही.

बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावरील बस स्थानक व व्यापारी संकुल कामासाठी वापरण्यात आलेले गौण खनिज उत्खनन बाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे तहसीलदारांनी वाळू, मुरूम, डबर, क्रश संड प्रकरणी ३,६६,२२,८६९/- दंडात्मक कारवाईचे आदेश सोमवारी काढले.

विकसकाने तहसीलदाराना सादर केलेल्या ५२० ब्रासच्या वाळू परवाना प्रती बनावट 

विकसक कातोरे याने अंदाजे ५२० ब्रासच्या बनावट पावत्या कोपरगाव येथील काही लिलाव धारकांकडून घेतलेल्या आहेत. त्या पावत्याची वाहन क्रमांकसह पडताळणी करून मिळणेबाबत खताळ यांनी कोपरगाव तहसीलदारांकडे माहिती मागितली होती. त्यानुसार तहसील कार्यालय, कोपरगाव क्र.कावि/गौख/५९२/२०१९ दि. ०७/०८/२०१९ नुसार पावती पडताळणी केली असता त्यांची नोंद आढळून आलेली नाही. याचा अर्थ त्या पावत्या पूर्णता बनावट असल्याचे सिद्ध झाले. 

विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अमोल खताळ पाटील यांनी ४ वर्ष सर्व पुरावे असताना प्रलंबित प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होऊन दंडात्मक कारवाई तहसीलदार यांनी करावी लागली. विकसक कातोरे यांना झालेला दंड जोपर्यंत भरणा केला जात नाही तो पर्यंत याबाबत पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे अमोल खताळ पाटील यांनी सांगितले .

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 478
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.