Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आर्या नवले हिस राज्यस्तरीय ‘बालशौर्य’ पुरस्कार
सामाजिक

आर्या नवले हिस राज्यस्तरीय ‘बालशौर्य’ पुरस्कार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/01/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : सिन्नर येथील उडान फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार संगमनेरच्या आर्या सुनील नवले हिला प्राप्त झाला. एका जीवघेण्या अपघातात समयसूचकता व धाडस दाखवत आपल्या आईचे प्राण आर्या नवले हिने वाचवले होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सिन्नर येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सिन्नर नगरपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर व नाशिक येथील जीवन मार्गदर्शक व्याख्यात्या नीता अरोरा यांच्या हस्ते आर्या नवले हिला ‘बालशौर्य पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. नाशिक जिल्हा बाल विकास मंडळाचे न्यायाधीश गणेश कानवडे, उडान फाउंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे, वाजे विद्यालयाचे प्राचार्य वारुंगसे, बांधकाम व्यावसायिक सतीश दुबे, गजानन जगताप व नितीन आव्हाड पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित होते.

संगमनेरमधील अकोले नाका परिसरात झालेल्या अपघातात आर्याने मोठ्या धाडसाने आपल्या आईचे प्राण वाचवले होते. आर्या स्वतः रात्रभर तापाने आजारी होती. सकाळी तिची आई मनीषा या स्कुटीवरून तिला दवाखान्यात घेऊन चालल्या होत्या. समोरून चुकीच्या दिशेने आलेली दुचाकी आणि मागून आलेल्या जीपमध्ये सापडलेली त्यांची स्कुटी जीपच्या धडकेने खाली पडली. या अपघातात मनीषा जीपच्या मागील टायरच्या अगदी पुढ्यात पडल्या होत्या. विरुद्ध बाजूला पडलेल्या आर्याने उठून मोठे धैर्य, समय सूचकता आणि प्रसंगावधान राखत आईच्या हाताला धरून मागे ओढले. अवघ्या काही सेकंदात आर्याने ही कृती केल्याने जीपच्या टायर खाली जाण्यापासून मनीषा नवले वाचल्या, परंतु त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावरून जीपचे चाक जाऊन त्यांना गंभीर दुखापत झाली होती. आर्याच्या या धाडसी कार्याची दखल घेत उडान फाउंडेशनने तिची बालशौर्य पुरस्कारासाठी निवड केल्याचे संस्थेचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी सांगितले.

देव मंदिरात असतो, तो माणसात भेटायला हवा. जो दुसऱ्यांना मदत करतो तोच खरा माणूस. आर्यासारख्या शौर्यवान मुलांमध्ये मला खरा माणूस दिसतो, असे प्रशंशोदगार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर यांनी काढले.

नीता अरोरा म्हणाल्या की, पालकांनी आपली स्वप्ने मुलांवर न लादता त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू द्यावे. मुलांनाही आपले आई-वडील आपल्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात याची जाणीव ठेवली तर भविष्यात नक्कीच सोनेरी दिवस येतील.

सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत शिंदे यांनी केले. अंकुश सहाणे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब शेळके, बाळासाहेब खैरनार, संदीप चौधरी, गणेश तांबोळी, सुनील निर्मळ, यश बेडेकर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

यांनीही केला गौरव

आर्या नवले हिने केलेल्या अतुलनीय धाडसाचे तत्कालीन महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही कौतुक केले होते. एका विशेष कार्यक्रमात त्यांनी आर्या नवले हिचा सत्कार, सन्मान देखील केला होता.

आर्या शिकत असलेल्या स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलनेही तिच्या कार्याची दखल घेत तिला यावर्षीचा ‘वीरश्री’ पुरस्कार घोषित केला होता. दोन दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि शाळेच्या संस्थापिका संज्योत वैद्य, अरविंद वैद्य, अजित काकडे आदर्श शिक्षक दत्तात्रेय आरोटे, ज्येष्ठ पत्रकार किसन भाऊ हासे यांच्या उपस्थितीत तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 438
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar18/10/20260

मेष – आजच्या दिवशी मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.