महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : शिवसेनेची अस्मिता असलेल्या हिंदू हृदय सम्राट, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
बस स्थानक चौकात झालेल्या या अभिवादन सभेसाठी शिवसैनिकांसह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी ठाकरे यांच्या जय जयकाराच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हास्तरीय नेते मुजीब शेख, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, आशा केदारी, सुरेखा गुंजाळ, संगीता गायकवाड, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख अमोल डुकरे, अक्षय बिल्लाडे, अक्षय गाडे, अक्षय गुंजाळ, गोविंद नागरे, प्रकाश चोथवे, शिवसेना उपशहर प्रमुख दीपक वन्नम व विकास डमाळे, शहर कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, राजेंद्र सातपुते, योगेश बिचकर, अपंग साह्य सेना जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, विजू सातपुते, दिलीप राऊत, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, फैसल सय्यद, वैभव अभंग, संभव लोढा, माधव फुलमाळी, रुपेश धाकतोडे आदी उपस्थित होते.

