Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकनेते थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी संगमनेरात ‘शिंदेशाही बाणा’
सामाजिक

लोकनेते थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी संगमनेरात ‘शिंदेशाही बाणा’

आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे सादर करणार कार्यक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री, लोकनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (5 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसात वाजता जाणता राजा मैदान येथे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे गोरगरीब व सर्वसामान्यांचे नेते असून महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून लोकप्रिय आहेत. महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक सलग आठ वेळा निवडून येत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण ,पाटबंधारे ,रोजगार हमी योजना, खारजमीन, राजशिष्टाचार, जलसंधारण या विभागांची खाती सांभाळली आहेत. महसूल विभागाला हायटेक बनवताना लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून शालेय शिक्षण विभाग सांभाळताना बेस्ट ऑफ फाईव्हचा निर्णय तर कृषी विभागात एक लाख शेततळ्यांची निर्मिती त्यांनी केली आहे.
याचबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे ते सदस्य असून महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करताना राज्यात काँग्रेसला पुन्हा भरारी दिली आहे. याचबरोबर उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण करून कालव्यांची कामे अहोरात्र सुरू केली.
अशा या लोकप्रिय नेत्याचा वाढदिवस संपूर्ण राज्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा होत असून संगमनेरमध्येही 7 फेब्रुवारी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गतच रविवारी सायंकाळी साडेसात वाजता जाणता राजा मैदान येथे शिंदेशाही बाणा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रम होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे ,मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांची उपस्थिती राहून अनमोल गीतांचा नजराणा हा कार्यक्रम होणार आहे.
जाणता राजा मैदानावर या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू असून या कार्यक्रमाला संगमनेर, अकोले व जिल्ह्यातील नागरिक व महिला, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाने केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 202
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.